गेवराई रोडवर वीट उत्पादकांनी नुकत्याच वीटभट्टय सुरू केली होत्या
वाळूअभावी आधीच बांधकाम बंद असल्याने विटांना फारशी मागणी नाही. त्यातच वादळवाऱ्यासह बेमोसमी पावसाचे संकट उद्भवल्याने वीटभट्ट्यांनाही फटका बसत आहे. वीटभट्टी मालक हताश झाले आहेत.
मंठा तालुक्यात वाळू बंद असल्याने अनेक ठिकाणचे बांधकामे थांबलेले आहेत, त्याचा देखील वीट उत्पादकांना फटका बसला आहे. तयार
झालेल्या पक्क्या विटा शिल्लक राहत आहेत. त्यातच तालुक्यात अचानक हवा सह पाऊस पडल्याने वीट उत्पादक तारांबळ उडाली असून रविवारी रात्री वादळी वाऱ्यासह दमदार पाऊस व काही ठिकाणी गारा पडल्या आहे. त्यामुळे वीट उत्पादकांनी तयार झालेल्या कच्च्या विटा प्लॅस्टिक ताडपत्रीने झाकून होत्या पण हवा येवढी होती की ताडपत्री हावाने उडुन गेल्या ९०% कच्च्या विटाचे नुकसान झाले आहे .विटा बनविण्याचे काम थांबल्याने वीटभट्टीवरील कामगारांची रोजमजुरी बुडत आहे.
बेमोसमी हवासह पावसाचा वीटभट्ट्यांनाही फटका गजानन माळकर पाटील जालना जिल्हा प्रतिनिधी मंठा.
Leave a comment