पुणे – गणेश मूर्ती खरेदीसाठी दोन लाख रुपयांची वर्गणी न दिल्यामुळे मेट्रोच्या पुलाचे काम करणाऱ्या एका अधिकाऱ्याला लाकडी दांडक्याने मारहाण केल्याची घटना डेक्कन जिमखाना भागात या प्रकरणी शरद हरिभाऊ उगले (वय ६२, रा. सोमेश्वरवाडी, पाषाण) यांनी डेक्कन पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून एकाविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला. श्रीकांत संतोष मरळ असे गुन्हा दाखल झालेल्या संशयिताचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, झेड ब्रिजजवळ खाऊ गल्लीत एका ठेकेदार कंपनीकडून मेट्रोच्या पादचारी पुलाच्या कॉंक्रिटचे काम सुरू आहे.घडली.त्यावेळी मरळने गणेशोत्सव मंडळाची मूर्ती खरेदी करण्यासाठी अधिकाऱ्याकडे दोन लाखांची मागणी केली होती. परंतु त्यांनी वर्गणी दिली नाही. त्यामुळे मरळने लाकडी दांडके आणि फावड्याने अधिकाऱ्याला मारहाण करुन गंभीर जखमी केले. पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक निकुंभ करीत आहेत.
Users Today : 18