चाकण – दौंडकरवाडी (ता. खेड) येथील एका मूकबधिर, वेडसर मुलाने वडिलांच्या डोक्यात दगड मारल्याने ते गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असताना रात्री पावणे आठच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला.खंडू नाथू लांडे (वय ७७) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी त्यांचा मुलगा नितीन खंडू लांडे ( वय ३५) याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्याच्यावर खून प्रकरणी गुन्हा दाखल केला अशी, माहिती चाकण पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अशोक कदम यांनी दिली.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा प्रकार आज दुपारी बाराच्या सुमारास त्यांच्या राहत्या घरासमोर घडला. पोलिसात फिर्याद बाबाजी खंडू लांडे यांनी दिलेली आहे. मूकबधिर वेडसर मुलगा अविवाहित आहे.
Users Today : 18