ओंकार येलभर याची विभागीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड

Khozmaster
1 Min Read

आंधळगाव, ता. १ : मांडवगण फराटा (ता. शिरूर ) येथील वसंतराव फराटे पाटील कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील तृतीय वर्षाचा विद्यार्थी ओंकार येलभर याने सोमेश्वरनगर (ता. बारामती) येथे पार पडलेल्या अंतर महाविद्यालयीन कुस्ती स्पर्धेतील ९७ किलो वजन गटातून प्रथम क्रमांक पटकाविला. या कामगिरीसाठी त्याची विभागीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड झाली आहे. या यशाबद्दल वाघेश्वर ग्रामविकास प्रतिष्ठान संस्थेचे संस्थापक अध्यक्ष राजीव फराटे पाटील यांच्या शुभहस्ते ओंकारचा सत्कार करण्यात आला.याप्रसंगी बोलताना फराटे म्हणाले की, आजची पिढी मोबाईल आणि पुस्तकांच्या खाली चिरडून गेली आहे. त्यामुळे अंगातून घाम जाण्यासारखा कुस्ती हा खेळ आजच्या मुलांसाठी सगळ्यात उपयोगी आहे. युक्ती आणि शक्ती दोन्ही या खेळात आहे. आत्ताची पिढी बुद्धीने भरपूर आहे, फक्त शरीराने कमजोर असणाऱ्या या पिढीला कुस्तीची गरज आहे. त्यामुळे महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी बौद्धिक श्रमाबरोबरच शारीरिक श्रमाकडेही लक्ष दिले पाहिजे.या वेळी वाघेश्वर ग्रामविकास प्रतिष्ठान संस्थेचे संस्थापक उपाध्यक्ष ज्ञानेश्वर फराटे पाटील, सचिव मृणाल फराटे, प्राचार्य डॉ. लक्ष्मण शितोळे, उपप्राचार्य प्रविण कुरुमकर यांच्यासह सर्व प्राध्यापक व शिक्षकेत्तर कमचारी यांनी ओंकारचे अभिनंदन केले. तसेच, पुढील स्पर्धसाठी शुभेच्छा दिल्या.माझ्या या यशामागे प्रशिक्षक स्नेहल जाधव यांचे मोठे योगदान आहे. आपल्या गुरुप्रति असलेलली निष्ठा, प्रेम व कष्ट करण्याची तयारी यामुळे हे यश मिळवू शकलो.
– ओंकार येलभर, कुस्तीपटू

0 9 3 7 7 1
Users Today : 9
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *