मंचर : पुणे- नाशिक राष्ट्रीय महामार्गावर मंचर जवळ जीवन रेस्टॉरंट परिसरात क्लोजर गाडीने समोर चाललेल्या टेम्पोनला धडक दिल्याने झालेल्या अपघातात तीन जण ठार झाले असून पाच जण गंभीर जखमी झाले आहेत शुक्रवारी पहाटे पाच वाजता हा भीषण अपघात झाला आहे. दाट धुके असल्यामुळे मंद गतीने चाललेला टेम्पो क्रुझर गाडी चालकाच्या लक्षात न आल्याने टेम्पोलाधडक बसून अपघात झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. क्रुझर गाडीचा अक्षरशः चेंदामेंदा झाला आहे. जखमींना बाहेर काढताना स्थानिक नागरिक व पोलिसांना कसरत करावी लागली.अपघातातील मृत व जखमी व्यक्ती जायखेडा तालुका सटाणा जिल्हा नाशिक येथील असून ते भोसरी येथील एका नातेवाईकाला भेटण्यासाठी जात असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली. जखमी रुग्णावर मंचर उपजिल्हा रुग्णालय व काही खाजगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.मृतांची नावे: क्रुझर चालक पंकज खंडू जगताप ( वय ३६), मधुकर तुकाराम अहिरे (५२) शांताराम संभाजी अहिरे (वय ५०) मंचर पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला आहे मंचर उपजिल्हा रुग्णालया त शवविच्छेदनप्रक्रिया सुरू झाली आहे. याप्रकरणी पुढील तपास मंचर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बलवंत मांडगे यांच्या मार्गदर्शनाखालीपोलीस हवालदार राजेंद्र हिले करत आहेत.
Users Today : 18