आंधळगाव, ता. १ : मांडवगण फराटा (ता. शिरूर) येथील नितीन नारायण फराटे यांची पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) सोशल मीडियाच्या उपाध्यक्षपदी निवड झाली आहे. राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर, शिरूर तालुकाध्यक्ष रवी काळे, राष्ट्रवादी युवकचे जिल्हाध्यक्ष सचिन घोटूकले, राष्ट्रवादी महिला जिल्हाध्यक्ष मोनिका हरगुडे यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देण्यात आले. या वेळी पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस उपाध्यक्ष श्रीनिवास घाडगे, कात्रज दूध संघाचे संचालक स्वप्नील ढमढेरे, महिला तालुकाध्यक्ष आरती भुजबळ, युवक तालुकाध्यक्ष अमोल वर्पे, युवती तालुकाध्यक्ष तज्ञिका कर्डीले, विद्यार्थी तालुकाध्यक्ष अमित गव्हाणे, सोशल मीडिया तालुकाध्यक्ष नीलेश चव्हाण, रंजन झांबरे, तृप्ती सरोदे आदी उपस्थित होते.
Users Today : 9