प्रविण चव्हाण
नंदुरबार (प्रतिनिधी)- शिवसेनेच्या शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष आ.चंद्रशेखर बावनकुळे यांचे स्वागत करून पुष्पगुच्छ देत सत्कार केला.
भाजपच्या घर चलो अभियानांतर्गत प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे गुरुवारी नंदुरबारच्या दौऱ्यावर आले होते.
त्याप्रसंगी त्यांचे ठिकठिकाणी स्वागत करण्यात आले. सकाळी ११ वाजता छत्रपती शिवाजी महाराज नाट्य मंदिर परिसरात शिवसेनेच्या शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष आ.चंद्रशेखर बावनकुळे यांचे स्वागत करून पुष्पगुच्छ देत सत्कार केला.
याप्रसंगी शेतकरी सहकारी संघाचे चेअरमन बी.के पाटील,जि.प सदस्य देवमन पवार, कृषी उत्पन्न बाजार समितीचे चेअरमन विक्रमसिंह वळवी,माजी उपनगराध्यक्ष कुणाल वसावे,माजी सभापती कैलास पाटील,माजी नगरसेवक रवींद्र पवार, शिवसेनेचे महानगरप्रमुख विजय माळी,तालुकाप्रमुख डॉ.सयाजीराव मोरे, शेतकरी सहकारी संघाचे संचालक सुरेश शिंत्रे,चेतन वळवी आदी उपस्थित होते.
Users Today : 8