दुय्यम निबंधक कार्यालयात दलालामार्फत कामे घेणे बंद करा

Khozmaster
1 Min Read

विजयकांत गवई

प्रति चिखली:-  चिखली सह दुय्यम निबंधक कार्यालयात दलालामार्फत काम घेणे बंद करण्यात यावे अशी मागणी रिपब्लिकन सेनेच्या वतीने जिल्हाधिकारी यांना दि.1 डिसेंबर 2023 रोजी देण्यात आले. चिखली तालुक्यातील चिखली सह दुय्यम निबंधक कार्यालयात खरेदी विक्री सारखे अनेक कामे मोठ्या प्रमाणात दलालामार्फत केली जाते चिखली सह दुय्यम निंबधक कार्यालयामध्ये अधिकारी कमी आणि दलाल जास्त दिसत आहे निबंधक कार्यालया अंतर्गत  ऑनलाईन काम हे सर्व  दलालामार्फत पैसे दिले की काम झटकन पटकन होते दुय्यम निबंधक अधिकारी यांच्या आशीर्वादाने दलालांचे कामे मोठ्या प्रमाणात सुरू आहे शेतकरी मोल मजूर आप आपली कामे सोडून दोन ते तीन दिवस कार्यालयाचे चकरा मारतांना दिसतात तरी त्यांचे कामे होत नाही मोठेलोक प्लॉट, शेती खरेदी करणारे त्यांचे कामे झटपट होतात गोर गरिबांना कार्यालयाचे फक्त चकरा मारावे लागतात धनाडे यांना चकरा मारण्याचे काम नाही त्यांनी फक्त फोन केला की काम होतात चिखली सह दुय्यम निबंधक कार्यालयात दलालामार्फत काम करून घेणाऱ्या अधिकारी व कर्मचारी यांच्यावर कारवाई करून दलालामार्फत कामे घेणे बंद करण्यात यावे अन्यथा रिपब्लिकन सेनेच्या वतीने आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा रिपब्लिकन सेनेचे बुलढाणा जिल्हाध्यक्ष विजयकांत गवई यांनी निवेदनामध्ये दिला निवेदन देतेवेळी रिपब्लिकन सेनेचे बुलढाणा जिल्हा अध्यक्ष विजयकांत गवई, जिल्हा महासचिव सलीमभाई, चिखली शहर उपाध्यक्ष सतीश पवार, गोलू श्रीसागर हे होते

0 9 4 1 7 3
Users Today : 9
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *