डॉक्टर सुनील कायंदे यांनी केली पाहणीअवकाळी पाऊस झाल्यामुळेगारपीट

Khozmaster
1 Min Read
दत्ता हांडे देऊळगाव राजा.
बुलढाणा जिल्ह्यात रविवारी रात्री झालेल्या अवकाळी पावसाने पिकांना प्रचंड फटका बसला. शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले. आज सकाळी सिंदखेड राजा तालुक्यातील पिंपळगाव लेंडी, पळसखेड चक्का या गावांत थेट शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत जाऊन नुकसानाची पाहणी केली व शेतकरी बांधवासोबत संवाद साधला
पिंपळगाव लेंडी पळसखेड चक्का या एका -एका गावात 90-100  शेटनेट आहेत. अवकाळी पाऊस आणि गारपिटीने शेडनेटमध्ये लावलेले टोमॅटो, वांगी, मिरची आदी पिकांचे प्रचंड नुकसान झाले. शेडनेट उभारणीसाठी लाखो रुपयांचा खर्च येतो. राज्य, केंद्र सरकार  शेडनेटला नुकसान भरपाई देत नाही. या शेतकऱ्यांना तत्काळ योग्य प्रमाणात नुकसान भरपाई देण्याची गरज आहे. केंद्र व राज्य सरकार यांनी विशेष बाब म्हणून अशा शेतकऱ्यांना मदत द्यावी.  तसेच खासगी सीड कंपनी या शेतकऱ्यांच्या माध्यमातून लाखो-करोडो रुपये कमावतात त्यांनीसुद्धा अशावेळी या शेतकऱ्यांना मदत केली पाहिजे
बाकीच्या गावांमध्ये कपाशी, तूर, हरभरा पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे त्यांनाही  भरीव मदत मिळाली पाहिजे
काही गावांमध्ये घरावरील टिन पत्रे उडाली त्यांनाही शासनाकडून मदत मिळवी
शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास अवकाळीने हिरावला आहे. सरकारने शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने न पुसता योग्य प्रमाणात नुकसान  भरपाई देऊन शेतकऱ्यांना पाठबळ द्यावे.
0 9 4 1 7 3
Users Today : 9
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *