अवकाळी पावसामुळे शेतकरी चिंतेत

Khozmaster
1 Min Read
प्रतिनिधी रामप्रसाद सुरुशे सावरगाव (मुंडे ): लोणार तालुक्यात गत
दोन दिवसापासून ठाण मांडून बसलेल्या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाल्याचे चित्र पाहवयास मिळत आहे.
गतहंगामात पावसाच्या
शेतकऱ्यांची खरिपाची पावसामुळे भाजीपाला पिकाचे पिके धोक्यात आल्याने झालेले नुकसान. सक्काळ
नियमितपणामुळे व पावसाळा लवकरच संपल्यामुळे आधीच त्यांना आर्थिक फटका सहन करावा लागला होता. परंतु, नेहमीप्रमाणे हार न मानता शेतकऱ्यांनी रब्बी हंगामात गहू, हरभरा, कांदा पिकांची लागवड केली. परंतु, गेल्या दोन दिवसापासून अवकाळी पावसाचा जोर वाढल्यामुळे गहू, हरभरा, कांदा, पालेभाज्यासह फळ पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. त्यामुळे खरिपा सारखीच रब्बी पिकेही हातची निघून जातात की काय अशी चिंता शेतकऱ्यांना लागली आहे. गतवर्षी शेतकऱ्यांनी काढलेल्या पीक विम्याचे पैसे सुद्धा अद्यापपर्यंत अनेक शेतकऱ्यांना मिळाले नाहीत. निसर्गाचा लहरीपणा व शासनाच्या नाकर्तेपणाच्या धोरणाने शेतकरी पूरता हवालदिल झाला आहे. शासनाने शेतकऱ्यांच्या पीक नुकसानीचे सर्वेक्षण करून शेतकऱ्यांना मदत करावी, अशी मागणी शेतकरी करीत आहेत.
0 9 4 5 5 9
Users Today : 24
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *