सावळदबारा पशुवैद्यकीय अधिकारी डॉ यांनी लक्ष देण्याची गरज; भूषण राणा यांची मागणी
सोयगाव प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत
सोयगाव तालुक्यातील हिवरी/मोलखेडा फर्दापूर जिल्हा परिषद सर्कलमध्ये सावळदबारा परिसरात पशुसंवर्धन विभागाच्या वतीने लसीकरण मोहीम राबविली जात असली तरी लम्पी स्किन आजाराचा धोका अजूनही टळला नसल्याचे हिवरी गावात दिसून आले आहे.शेतकरी संतोष सरदार पाटील हिवरी यांच्या बैलाला लम्पी आजाराची लागण झाली आहे सावळदबारा पशुवैद्यकीय अधिकारी डॉ यांनी लक्ष देण्याची गरज आहे अशी मागणी उपसरपंच गुलाबसिंग राणा व भूषण राणा यांनी केली आहे. दि.२६/९/२२ रोजी मोलखेडा शिवाजी मंख या शेतकऱ्यांचा बैला आजराने दगवला आहे.यामुळे शेतकरी व पशुपालकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाल्याचे दिसत आहे. सावळदबारा पशुवैद्यकीय केंद्रा अंतर्गत येणाऱ्या परिसरात हिवरी येथे आतापर्यंत नेमक्या किती गुरांना लम्पी स्किन आजाराची लागण झाली आहे.याचा अकडा मात्र समोर आला नाही.सर्कलमधील सावळदबारा पशुवैद्यकीय केंद्रा अंतर्गत येणाऱ्या मोलखेडा / हिवरी. गावात लम्पी स्किन आजाराने पहिला बळी घेतला आहे.अशातच संतोष पाटील यांच्या बैला लागण झाली आहे.वैद्यकीय अधिकारी डॉ यांनी लक्ष द्यावे अशी मागणी भूषण राणा यांनी केली आहे.यावेळी सरपंच ज्ञानेश्वर वारंगणे, उपसरपंच गुलाबसिंग राणा,अमोल शेळके, वैभव गायकवाड उपस्थित होते.