महाविद्यालयीन तरुणाचा खून करणारा चार दिवसात जेरबंदलोणीकंद पोलिसांची कामगिरी

Khozmaster
2 Min Read

वाघोली – महाविद्यालयीन तरुणाचा कोयत्याने वार करून खून करणाऱ्या तरुणाला लोणीकंद पोलिसांनी शुक्रवारी सायंकाळी जेरबंद केले. घटनेनंतर चार दिवसातच आरोपीचा छडा लावला. समलैंगिक प्रेमप्रकरणातूनच हा खून झाल्याचे उघड झाले आहे. लोणीकंदचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वजित काईंगडे यांनी ही माहिती दिली.महेश साधू डोके या तरुणाचा मंगळवारी दुपारी खून झाला होता. या प्रकरणी सागर अशोक गायकवाड (वय-32, पारगाव, ता. दौंड) याला अटक करण्यात आली आहे. वाघोलीतील बकोरी रोड परिसरात गायकवाड याने डोके याचा कोयत्याने वार करून खून केला होता. त्यानंतर गायकवाड हा दुचाकीवर आपल्या गावी पारगाव येथे निघून गेला. तेथून त्याने एकाकडून पैसे घेवून यवत येथून रेल्वेने चेनई गाठली.मात्र पोलिसांनी त्याला अखेर पुण्यात जेरबंद केलेच. डोके व गायकवाड यांची दुचाकीवर लिफ्ट देण्याच्या बहाण्याने ओळख झाली. त्यानंतर त्यांच्यात प्रेम जुळले. गायकवाड हा दररोज डोके याला महाविद्यालयात सोडत व तेथून पुन्हा होस्टेलवर सोडत होता. अलीकडे डोके हा गायकवाडला टाळू लागला होता. त्यामुळे संतापून त्याने त्याचा खून केला. गायकवाड हा विवाहित आहे.

मात्र विवाहानंतर चार महिन्यांतच त्याची पत्नी त्याला सोडून गेली. तो अभियंता आहे. तर डोके हा अनाथ होता. वाडेबोलाई येथील आश्रमात तो राहत होता. लोणीकंदचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वजित काईंगडे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) मारुती पाटील, सीमा ढाकणे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक रवींद्र गोडसे, उपनिरीक्षक बाळासाहेब सकाटे, स्वप्नील जाधव, अजित फरांदे यांनी ही कामगिरी केली.

फिर्यादी मुळेच खुनी अटकेत

या खुनाच्या घटने प्रकरणी कृष्णकांत यादव यांनी फिर्याद दिली. डोके याच्यावर वार झाल्यानंतर त्याने आरडा ओरडा केला. त्यामुळे यादव यांचे लक्ष गेले. ते डोके याच्या दिशेने निघाले. त्यामुळे वार करून गायकवाड याने पळ काढला. यादव यांनी जखमी डोके याला एका रिक्षात घालून वाघोली येथील खाजगी रुग्णालयात. मात्र तेथून ससून येथे हलवावे लागले. तेथून त्यांनी ससूनला नेले.

दरम्यानच्या काळात त्यांनी त्याचा कपडा बांधून रक्तस्राव थांबविण्याचा प्रयत्न केला. दरम्यान घटनेविषयी तसेच कोणी खून केला याची माहिती यादव यांनी डोके याच्या कडून घेवून पोलिसांनी कळविली.मात्र त्याचा रस्त्यात मृत्यू झाला. यादव यांच्यामुळे पोलिसांना खून करणाऱ्याची माहिती मिळाली व त्याला जेरबंद करण्यात यश आले.

विशेष बाब म्हणजे यादव यांचे चार डिसेंबरला लग्न आहे. मात्र त्यांनी त्याचा विचार न करता जखमी डोके याला रुग्णालयात नेले. व फिर्यादही दिली.

0 9 3 7 3 7
Users Today : 18
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *