संत साहित्यातून प्रबोधन, प्रशिक्षण आणि संस्कार होत असतात. त्यामुळे प्रत्येक पिढीला ते मार्गदर्शक ठरते. ‘विदर्भातील संत’ हा ग्रंथ त्यामुळेच युगानुकूल, समाजोपयोगी आणि युवापिढीसाठी मार्गदर्शक असा ठरेल. पारडीमध्ये उड्डाणपुलाच्या प्रत्येक खांबावर विदर्भातील संतांचे चित्र, परिचय आणि माहिती द्यावी, असा आपला मानस असल्याचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले.
विदर्भ साहित्य संघाचे उपाध्यक्ष डॉ. राजेंद्र डोळके यांच्या ‘विदर्भातील संत’ या ग्रंथाच्या प्रकाशनाप्रसंगी गडकरी बोलत होते. अध्यक्षस्थानी वि. सा. संघाचे अध्यक्ष प्रदीप दाते होते. प्रख्यात संशोधक डॉ. म. रा. जोशी यांची यावेळी उपस्थिती होती. गडकरी म्हणाले, पारडीमध्ये उड्डाणपुलाच्या प्रत्येक खांबावर विदर्भातील संतांचे चित्र, परिचय आणि माहिती द्यावी, असा आपला मानस आहे. या कार्यात डॉ. डोळके यांच्या पुस्तकाचा लाभ होणार असून माहिती तपासून घेणे सोपे होणार आहे.
Users Today : 9