पूरग्रस्तांना राज्य शासनाची ८ कोटींची मदत

Khozmaster
1 Min Read

सप्टेंबरमध्ये अंबाझरी ओव्हर फ्लो झाल्याने नाग नदीला आलेल्या पुरात नागरिकांचे मोठे नुकसान झाले. याशिवाय नाग नदीची संरक्षक भिंत पडली, रस्तेही वाहून गेले. नाग नदीची संरक्षक भिंत, पूलाचे पुनर्बांधकाम, रस्ते दुरुस्तीसाठी राज्य सरकारने ८ कोटी ३८ लाख रुपये दिल्याची माहिती महसूल विभागाने दिली.सप्टेंबरमध्ये झालेल्या पावसामुळे अंबाझरी तलाव ओव्हर फ्लो झाला होता. त्यातील पाणी डागा ले-आऊट, अंबाझरी ले-आऊट, कार्पोरेशन कॉलनी, समता ले-आऊटमध्ये शिरले. या वस्त्यांमध्ये अक्षरशः सहा ते सात फुटापर्यंत पाणी साचल्याने नागरिकांचे अतोनात नुकसान झाले.अंबाझरी तलावातील पाण्‍याच्या प्रवाहाने नाग नदीच्या संरक्षक भिंती पडल्या. वस्त्यांतील रस्तेही वाहून गेले. राज्य सरकारच्या महसूल व वन विभागाने काल, पुलाचे पुनर्बांधकाम, रस्त्यांची दुरुस्ती, नुकसानग्रस्त घरांसाठी आर्थिक मदतीसाठी ८ कोटी ३८ लाख रुपयांचा निधी दिला. डागा ले-आऊट, अंबाझरी ले-आऊट, कार्पोरेशन कॉलनी, समता ले-आऊटसह शहराच्या इतरही भागात पावसामुळे ड्रेनेज लाईनचे नुकसान झाले.

ड्रेनेज लाईन दुरुस्तीसाठीही हा निधी वापरण्यात येणार आहे. पुलाच्या पुनर्बांधकामासाठी राज्य सरकारने ६ कोटी दिले असून नाल्यांच्या बांधकामासाठी ९० लाख, ६१ किमी रस्त्‍यांच्या दुरुस्तीसाठी ६१ लाख ३८ हजार, नुकसानग्रस्त घरांना आर्थिक मदतीसाठी ८५ लाख ४४ हजार तर ड्रेनेज लाईन दुरुस्तीसाठी १ लाख ७२ हजार रुपये दिले आहे.

0 9 3 7 7 1
Users Today : 9
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *