भाजपसोबत जाण्याची चर्चा एका मोठ्या नेत्यासोबत झाली होती; हसन मुश्रीफांचा मोठा गौप्यस्फोट

Khozmaster
1 Min Read

कोल्हापूर : ‘माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष संपवण्यासाठीच कॉंग्रेसने राज्यात पाठवले होते. त्यांच्यामुळेच राज्यातील कॉंग्रेस (Congress) आघाडीची सत्ता गेल्याची टीका वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांनी केली.येथील विमानतळावर काल (शुक्रवार) सकाळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते. मंत्री मुश्रीफ म्हणाले, ‘कोरोना काळातील गैरव्यवहाराबाबत मुंबई महापालिकेचे आयुक्त इक्बाल चहल यांची राज्य सरकार चौकशी करेल.आमदार बच्चू कडू हे मंत्री छगन भुजबळ मुख्यमंत्री पदाचे दावेदार असल्याचे म्हणत असतील, तर १४६ आमदार ज्यांचे निवडून येतील त्यालाच मुख्यमंत्रिपदावर बसता येईल.’ ते पुढे म्हणाले, ‘राजकीय भूमिका बदलली, त्याचा मी पहिल्यापासून साक्षीदार आहे. भाजपसोबत जाण्याची चर्चा एका मोठ्या नेत्यांसोबत झाली होती. त्यावर वारंवार आम्ही भूमिका स्पष्ट केलेली आहे. प्रफुल्ल पटेल यांनी यापूर्वीच याबाबत सांगितले आहे.’

0 9 3 7 7 4
Users Today : 12
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *