कोल्हापूरः औषध दुकानाच्या कॅश ड्रॉवरमधील रोख १६ हजारांसह तेथील सीसीटीव्ही कॅमेरा चोरट्याने पळविला. आर.के. नगरमध्ये दोन दिवसांपूर्वी ही चोरी झाली. याची नोंद करवीर पोलिस ठाण्यात झाली. पोलिसांनी सांगितले की, सुनील लक्ष्मण देशपांडे (वय ५४, रा.आर.के.नगर) यांचे आर.के.नगरमध्ये ‘सिद्धाई’ हे औषध विक्रीचे दुकान आहे. बुधवारी (ता.२९) रात्री दहा वाजता दुकान बंद करून ते घरी गेले. दुसऱ्या दिवशी गुरुवारी सकाळी दहा वाजता दुकान उघडण्यासाठी आले, तेंव्हा शटरचे कुलूप तोडलेले आणि काचा फोडलेल्या दिसल्या. चोरट्याने दुकानात प्रवेश करून कॅश ड्रावरमधील १६ हजारांची रोकड व सीसीटिव्ही कॅमेरा असा एकूण १९ हजारांचा मुद्देमाल चोरल्याचे निदर्शनात आले. देशपांडे यांनी दिलेल्या फिर्यदीवरून करवीर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे.
Users Today : 18