पालकमंत्री वळसे पाटील यांनी केली पाहणी

Khozmaster
2 Min Read
देऊळगावराजा तालुका प्रतिनिधी राजेश पंडित .
 गेल्या रविवारी मध्यरात्री आलेल्या अचानक पाऊस तसेच गारपिटीमुळे अवकाळी पावसाचा फक्त हा संपूर्ण तालुक्याला बसला परंतु यामध्ये गारपीट तुळजापूर  महसूल मंडळात सर्वाधिक झाल्यामुळे जास्त फटका हा सदर महसूल मंडळातील 13 गावांना बसला आठ दिवस उलटूनही फक्त पंचनामेच्या घेरट्या   या चालू असून मदतीची अपेक्षा असताना आलेल्या लोकप्रतिनिधींनी आतापर्यंत आश्वासना पलीकडे दुसरे काही केले नाही आम्हाला तातडीची मदत द्या अशी मागणी आज शेतकऱ्यांनी पालकमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्याकडे केली
 सविस्तर वृत्त असे की
 जिल्ह्याचे पालकमंत्री आज सिंदखेड राजा तसेच देऊळगाव  राजा तालुक्यात झालेल्या अवकाळी पाऊस तसेच गारपिटीने नुकसानग्रस्त झालेल्या शेतकऱ्यांच्या थेट बांधावर जाऊन पाहणी  केली यातील सत्तेत असलेल्या नेत्यांनी धीर देऊन आपदग्रस्त शेतकऱ्यांचे नुकसान जाणून घेतले.तसेच यावेळी 100% टक्के नुकसान भरपाई चा अहवाल सादर करणार असल्याचे या वेळी त्यांनी सांगितले  तालुक्यातील  तुळजापूर, गोळेगाव, गिरोली, तसेच असोला जहांगीर येथे थेट बांधावर जाऊन पाहणी  केली. असता शेतकऱ्यांनी  त्यांच्या विविध समस्या मांडल्या यामध्ये शासनाची एक रुपयात एका पिक विमा योजना ही फसवी ठरली असून एग्रीकल्चर विमा कंपनीने काही तास त्यांची त पहावयास मिळाली या वेळी
 पालकमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या समवेत आमदार डॉक्टर राजेंद्र शिंगणे, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस डॉक्टर रामप्रसाद शेळके, जिल्हाधिकारी किरण पाटील, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी मनोज कुमार ढगे, तहसीलदार श्याम धनमणे, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष उद्धव मस्के, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती समाधान शिंगणे, गटविकास अधिकारी मुकेश माहोर, राजीव शिरसाट, गजानन पवार, गजानन चेके विलास शेळके, मधुकर शेळके,  रंगनाथ कोल्हे, गोपीचंद कोल्हे, सदाशिव मुंढे,  गणेश तिडके, लिंबाजी तिडके , यांच्यासह नुकसान ग्रस्त शेतकरी उपस्थित होते
0 9 3 7 7 4
Users Today : 12
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *