कॉग्रेसने उद्योगपतींची नाही तर शेतक-यांची कर्जमाफी केली0 – राहुलभाऊ बोंद्रे तालुक्यातील हराळखेड,पिंपरखेड व धानोरी येथे युवक कॉग्रेसच्या शाखांचे अनावरण

Khozmaster
3 Min Read

चिखली:
कॉग्रेसने उद्योगपतींचे कर्ज माफ न करता सातत्याने शेत मजुर गोरगरीबांसाठी काम करीत वेळोवेळी आर्थीक कोंडीत अडकलेल्या शेतक-यांचे कर्ज माफ केले. सत्तेत येण्यापूर्वी निवडणुकी दरम्यान मोदी सरकारने  दिलेल्या आष्वासनांचा त्यांना विसर पडला असुन थापाडया मोदी सरकारला धारेवर धरून जाब विचारला पाहीजे असल्याचे प्रतिपादन बुलडाणा जिल्हा कॉग्रेस कमिटीचे अध्यक्ष माजी आमदार राहुलभाउ बोंद्रे यांनी केले. युवकांना हुकूमषाही मान्य नसुन देषात लोकषाही आणुन ती टिकवण्यासाठी युवा वर्ग पुढे येत असल्याचा आपणास सार्थ अभिमान असल्याचे तालुक्यातील धानोरी, पिंपरखेड व हराळखेड येथील युवक कॉग्रेस शाखांचे अनावरण प्रसंगी केले.
चिखली तालुक्यातील हराळखेड, पिंपरखेड व धानोरी येथे काल दिनांक 01 डिसेंबर 2023 रोजी युवक कॉग्रेसच्या शाखांचे अनावरण तथा नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या. याप्रसंगी बोलतांना जिल्हा कॉग्रेस कमिटीचे अध्यक्ष माजी आमदार राहुलभाउ बोंद्रे पुढे म्हणाले की, कॉग्रेसची विचारधारा ही फुले-षाहु-आंबेडकर यांना अभिप्रेत असलेली विचारधारा असुन युवकांनी कॉग्रेस विचारधारा अंगीकृत करीत युवक कॉग्रेसच्या माध्यमातुन तळागळातील गोरगरीबांची पोलीस स्टेषन, विज वितरकण कंपनी, तहसिल कार्यालय, पंचायत समिती कार्यालय, संजय गांधी निराधार, कामगार कल्याणची कामे यासारख्या दैनंदीन जिवनात भेडसावणा-या अडचणींच्या कामात नागरीकांना मदत करावी. यावेळी केंद्र व राज्यातील भाजपा सरकारचा खरपूस समाचार घेत शेतक-यांचा खरीप हंगाम गेला, रब्बीचं पिकही गेल्यात जमा आहे. भाजपा सरकारने मागिल वर्षीची नुकसान भरपाई तर दिलीच नाही उलट नुक्त्याच झालेल्या नुकसानीचे पंचनामे बाकी असुन सत्ताधारी शेतक-यांकडे फिरकले नसल्याचा आरोप यावेळी त्यांनी केला.
युवक कॉग्रेसच्या गठीत करण्यात आलेल्या शाखेमध्ये हराळखेड येथील विजय चौधरी अध्यक्ष, गोविंद जाधव उपाध्यक्ष, पिंपखेड येथील प्रषांत जुमंडे अध्यक्ष, संतोष गवळी उपाध्यक्ष, व धानोरी येथील वैभव हिवरकर अध्यक्ष, अमोल हिवरकर व रोषन हिवरकर उपाध्यक्ष, यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या.
यावेळी तालुका युवक कॉग्रेसचे अध्यक्ष विकास लहाने, तालुका कॉग्रेसचे अध्यक्ष समाधान सुपेकर, माजी अध्यक्ष डॉ.सत्येंद्र भुसारी, राम डहाके, विजु पाटील शेजोळ, ज्ञानेष्वर सुरूषे, सरपंच मनोज लाहुडकर, समाधान गिते, सरपंच गणेष जवंजाळ, भारत खासभागे अमडापुर येथील गाजी बाबा, रफिकभाई,डॉ. विषाल देषमुख, बाबुराव सोनुने, रूपेष घोपल, शदाब खान, प्रकाष खराडे, विजय राउत, सुरेष गुंजकर, ज्ञानेष्वर पंचागे, विजय गिते, रायकर सर, शेख कडु लाला, अषोक घनघाव, अब्बु भाई, अनिस भाई, अमोल मोरे, श्याम सावंत, गजानन घनघाव, रफिकभाई उदयनगर, शोहरब सैयद, अक्रम खासाब यांची उपस्थिती होती.

युवक कॉग्रेसच्या शाखा अनावरण प्रसंगी उपरोक्त तिनही गावांच्या उपस्थितांमध्ये हराळखेड येथील माधव मावळे, हनुमान थोरात, राजु जाधव, ब्रदीभाउ हाडोळे, गणेष जाधव पिंपरखेड येथील गजानन खंडारे, गजानन उमाळे, षिवाजी वाळोकार,गजानन जुमडे, धानोरी येथील सरपंच विषवास पाटील हिवरकर, किषोर पाटील, देवानंद हिवरकर, उमेष हिवरकर, यांच्यासह सरपंच, सदस्य, सोसायटी अध्यक्ष, संचालक, वरील गावातील असंख्य स्त्री,पुरूष गावकरी मोठया संख्येने उपस्थित होते.
 

0 9 3 7 7 7
Users Today : 15
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *