पुणे (इंदापूर) : पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील पंधारवाडी येथे अनैतिक संबंधांच्या संशयावरून एका तरुणाचे अपहरण करून त्याची हत्या केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी इंदापूर पोलिसांनी तिघांना अटक केली असून चार दिवसांची पोलीस कोठडी इंदापूर न्यायालयाने सुनावली आहे. गणेश लक्ष्मण शिंदे (वय ३३), मच्छिंद्र लक्ष्मण शिंदे (वय ३०), आकाश सुरेश शिंदे (वय २२) (सर्व रा. पंधारवाडी, ता. इंदापूर) अशी आरोपींची नावे असून, वैभव शिवाजी पारेकर (वय २६ रा. पंधारवाडी) असं हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे. अनैतिक संबंधांच्या संशयावरून ही हत्या झाल्याचं समोर आलं आहे.
गावापासून ७० किलोमीटरवर निर्जनस्थळी पुरला मृतदेह
याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ज्या दिवशी आरोपी वैभवला आपल्यासमवेत घेऊन गेले, त्याच दिवशी त्यांनी बाह्यवळण रस्त्यापासून काही अंतरावर बेडशिंगे गावच्या हद्दीत धारदार हत्याराने वार करुन त्याची हत्या केली होती. त्याचा मृतदेह चारचाकीच्या डिक्कीत रात्रभर ठेवला. घरी आल्यानंतर सकाळी सात ते आठ वाजण्याच्या सुमारास ते त्या चारचाकीतून थेट ७० किलोमीटर अंतर पार करत शिंगणापूरच्या दिशेने गेले. शिंगणापूर ते दहिगाव दरम्यान वावरहिरे (ता.माण जि.सातारा) या गावच्या हद्दीत रस्त्यापासून साधारण दोनशे मीटर अंतरावर डोंगरदऱ्यातील माळावर खड्ड्यात त्यांनी वैभवचा मृतदेह पुरला. तेथून ते परत पंधारवाडीत आले होते.
Users Today : 18