पाणी पिण्यासाठी रस्त्यात थांबले, तेवढ्यात अनर्थ घडला, भीषण अपघातात वारकऱ्याचा मृत्यू

Khozmaster
1 Min Read

पुणे : पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातून जाणाऱ्या पुणे – पंढरपूर मार्गावर दौंडाज खिंडीत पिकअप टेम्पोने दिलेल्या धडकेत एका वारकऱ्यांचा मृत्यू झाला आहे. तर एक जण गंभीर जखमी झाला आहे.

कृष्णा नागोराव गरुड (वय २३, रा. मटकर आळा ता.जि. परभणी) यांचा मृत्यू झाला आहे. तर सिद्धेश्वर प्रभाकर बोबडे (वय २३, रा. बोबडे टाकली ता.जि. परभणी), रितेश राजाराम ब्रम्हे (वय १८, रा. बोबडे टाकली ता.जि. परभणी) आणि चक्रधर कोपलवर (वय २८ रा. साडेगाव ता.जि. परभणी) हे तीन जण यात जखमी झाले आहेत. अपघातग्रस्तांना वाहन पिकअप क्र.एमएच १४ जीयू ५०४५ आणि आरोपी नाव निलेश बाळासाहेब जगताप (वय ३५, रा. कोथले ता. पुरंदर जि. पुणे) याला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

जेजुरी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जेजुरी पोलीस स्टेशन हद्दीतील आज रविवारी श्री. क्षेत्र आळंदी येथील संजीवन समाधी सोहळ्यासाठी वारकरी जात असताना वारीसोबत चालणारे ४ वारकरी हे ट्रॅक्टर आणि त्यास जोडलेली पाण्याची टाकी यातून पाणी पिण्यासाठी व हात धुण्यासाठी रस्त्यावर गेले असता पाठीमागून नीरा बाजूकडून जेजुरी बाजूकडे जाणाऱ्या पिकप टेम्पोने पाठीमागून जोराची धडक मारून अपघात केला. या अपघातामध्ये तीन जण जखमी झाले असून एक जण जखमी झाला आहे. अनाचक झालेल्या अपघाताने रस्त्यावर एकच गर्दी झाली होती. वारकऱ्यांनी काही वेळ संताप देखील व्यक्त केला आहे.

0 9 3 7 3 7
Users Today : 18
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *