आयआयए’कडून गुणवंतांचा गौरव

Khozmaster
1 Min Read

फुलेवाडी : इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ आर्किटेक्टस् कोल्हापूर सेंटरतर्फे वास्तुशास्त्र क्षेत्रातील गुणवंत विद्यार्थी व पीएचडी पदवीप्राप्त वास्तुविशारदांचा सत्कार झाला.

राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य सतीशराज जगदाळे व आर्किटेक्ट गिरिजा कुलकर्णी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. श्रीक्षेत्र जोतिबा विकास प्राधिकरणच्या नियोजन समितीत निवड झाल्याबद्दल वास्तुविशारद संतोष रामाने, अभिनंदन मगदूम, पीएचडी पदवीप्राप्त वास्तुविशारद डॉ. अरुंधती वाटेगावे, डॉ. सुप्रिया पाटील, डॉ. अंजली जाधव, डॉ. मधुगंधा मिठारी यांचा सत्कार झाला.किमया’ मासिकाचे अनावरण झाले. ‘आयआयए’च्या विविध उपक्रमांत सहभागी करण्याचे आवाहन सतीशराज जगदाळे व गिरिजा कुलकर्णी यांनी केले. कोईमतूरचे सुप्रसिद्ध वास्तुविशारद प्रसन्न पर्वतीकर यांनी मार्गदर्शन केले.यावेळी मोहन वायचळ, प्रमोद कुलकर्णी, नरहर कुलकर्णी, सचिन घाटगे, निशिकांत गोरुले, सुरत जाधव, उमेश माने, मालदीकर, मगदूम, उज्ज्वला मिरजकर, रिचा माने, चंदारानी पाटील, हर्षदा नाईक, ऋषिकेश तंबाके, रसिका हावळ उपस्थित होते. अध्यक्षा संगीता भांबुरे यांनी स्वागत केले. सचिव प्रमोद चौगुले यांनी आभार मानले.

0 9 3 7 8 1
Users Today : 19
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *