शरद’मध्ये कौशल्य विकास कार्यक्रम

Khozmaster
2 Min Read

शरद’मध्ये कौशल्य विकास कार्यक्रम
आयएसटीईकडून प्रायोजकत्व ः ९७ प्राध्यापक सहभागी
दानोळी, ता. ४ ः यड्राव येथील शरद इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, पॉलिटेक्निक येथे कॉम्प्युटर इंजिनिअरिंग, कॉम्प्युटर सायन्स अॅण्ड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, इलेक्ट्रॉनिक्स अॅण्ड कॉम्प्युटर इंजिनिअरिंग, मेकॅनिकल, मेकॅट्रॉनिक्स, ऑटोमेशन अॅण्ड रोबोटिक्स इंजिनिअरिंग आणि इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग या विभागात कौशल्य विकास कार्यक्रम झाले. यामध्ये ९७ प्राध्यापकांनी सहभाग घेतला होता. यासाठी इंडियन सोसायटी फॉर टेक्निकल एज्युकेशन यांच्याकडून प्रायोजकत्व मिळाले होते.
कॉम्प्युटर, आयटी आणि इलेक्ट्रॉनिक्स विभागातील प्राध्यापकांसाठी ‘ऑब्जेक्ट ओरिएंटेड मॉडेलिंग अॅण्ड डिझाईन फॉर वेब अॅप्स युजींग जावा’ या विषयावर पुण्याच्या अॅटोस सिंटेलचे अभिजित पाटील यांनी मार्गदर्शन केले. यावेळी विभागप्रमुख प्रा. आर. एम. पाटील, प्रा. एस. एस. पाटील, प्रा. पी. पी. शेट्टी आदी उपस्थित होते.
मेकॅनिकल, मेकॅट्रॉनिक्स व ऑटोमेशन अॅण्ड रोबोटिक्स विभागातील प्राध्यापकांसाठी ‘डिजिटल मॅन्युफॅक्चरिंग’ या विषयावर रोबोसेफ सोल्युशनचे रोहित कदम व थ्रीडी प्रिंटिंगचे निरंजन शिंदे यांनी मार्गदर्शन केले. विभागप्रमुख प्रा. एन. एस. पाटील, प्रा. ए. के. मगदूम, प्रा. एस. एन. बोडके आदी उपस्थित होते.
इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग विभागातील प्राध्यापकांसाठी ‘इलेक्ट्रिकल ऑटोकॅड’ या विषयावर स्वस्तिक इंजिनिअरिंगचे रत्नाकर करव यांनी मार्गदर्शन केले. विभागप्रमुख प्रा. सी. एन. रावळ, समन्वयक आर. आर. चौगुले आदी उपस्थित होते. सिव्हिल विभागाच्या प्राध्यापकांनी पुणे येथील नो हाउ स्कूलमधील कार्यक्रमात सहभाग घेतला. तेथे ‘प्रॅक्टिकल कन्स्ट्रक्शन मॅनेजमेंट अॅण्ड ग्रीन प्रॅक्टिस’ या विषयावर मार्गदर्शन मिळाले. विभागप्रमुख प्रा. एम. के. चव्हाण यांच्यासह प्राध्यापक उपस्थित होते. संस्थेचे कार्यकारी संचालक अनिल बागणे यांचे मार्गदर्शन लाभले. प्राचार्य बी. एस. ताशीलदार यांचे सहकार्य लाभले.

0 9 3 7 8 1
Users Today : 19
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *