पोर्ले तर्फ ठाणेत पशवैद्यकीय शिबिर
पोर्ले तर्फ ठाणे : येथील पशुवैद्यकीय दवाखान्यातर्फे मौजे दरेवाडी (ता. पन्हाळा) येथे राज्यव्यापी वंध्यत्व निवारण अभियानअंतर्गत पशुवैद्यकीय शिबिर झाले. एकूण ३६ जनावरांवर उपचार करण्यात आले. शिबिरात २५ जनावरांना क्षार जीवनसत्त्व, जंतनशके, गोचिडनाशक औषधे वाटप केली. ११ गायी-म्हशींची वंध्यत्व तपासणी व इतर जनावरांना उपचार केले. शासकीय योजनांची माहिती देऊन जनजागृती करण्यात आली. डॉ. रोहित रानभरे, डॉ. आनंदा पोतदार, डॉ. करण जाधव, सदाशिव जांभळे यांनी परिश्रम घेतले. शिबिराचे उद्घाटन सरपंच कविता सरदार जाधव यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी उपसरपंच पंडित घोडके, सदस्य राजश्री जाधव, संपदा जाधव, अंजना खोपकर, शुभम दरेकर, सचिव संजय जाधव, नाराजी दरेकर उपस्थित होते.
पोर्ले तर्फ ठाणेत पशवैद्यकीय शिबीर
0
9
3
7
8
1
Users Today : 19
Leave a comment