ॲडव्होकेट दिनी जयसिंगपूरला वकिलांचा सत्कार

Khozmaster
1 Min Read

जयसिंगपूरः अॅडव्होकेटदिनी वकिलांना शुभेच्छाप्रसंगी इनरव्हील क्लब ऑफ जयसिंगपूर व जयसिंगपूर बार असोसिएशनचे पदाधिकारी.
—————–
ॲडव्होकेटदिनी
जयसिंगपूरला वकिलांचा सत्कार
सकाळ वृत्तसेवा
जयसिंगपूर, ता. ४ ः इनरव्हील क्लब ऑफ जयसिंगपूरतर्फे अॅडव्होकेट दिन साजरा करण्यात आला. अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयात आज महिला आणि पुरुष वकिलांचा सत्कार करून शुभेच्छा दिल्या.
इनरव्हील क्लब ऑफ जयसिंगपूरच्या अध्यक्षा शिल्पा अभिजित अडदंडे यांच्यासह महिला पदाधिकाऱ्यांच्या हस्ते गौरव केला. शिल्पा अडदंडे म्हणाल्या, ‘मुंबई उच्च न्यायालयाचे कोल्हापुरात खंडपीठ हाोण्यासाठी अनेक वर्षांपासून आंदोलने सुरू आहेत. कोल्हापूर, सांगलीसह अन्य जिल्ह्यांतील वकील आणि पक्षकारांचा वेळ आणि पैशाच्या बचतीबरोबर खटले गतीने निकालात निघण्यासाठी कोल्हापुरात खंडपीठाची आवश्यकता आहे. पाच जिल्ह्यांतील वकिलांच्या असोसिएशनने जो लढा उभारला आहे, त्याला इनरव्हील क्लब ऑफ जयसिंगपूरचा पाठिंबा आहे. येणाऱ्या काळात सामाजिक जाणीवेतून कोल्हापुरातील खंडपीठाच्या मागणीसाठी वकिलांच्या बरोबरीने पाठपुरावा करू.’
जयसिंगपूर बार असोसिएशनचे अध्यक्ष बी. बी. मगदूम यांनी इनरव्हील क्लब ऑफ जयसिंगपूरच्या उपक्रमाचे कौतुक करून आभार मानले. सचिव माधवी कोठावडे, अश्विनी पाटील, बार असोसिएशनच्या उपाध्यक्षा अॅड. उषा पाटील, सचिव अॅड. राहुल कट्टी, खजिनदार अॅड. अरविंद कोळी, अॅड. जी. के. आंबेकर, सी. एस. किल्लेदार, डी. जी. जगदाळे, एस. डी. जगदाळे, विनोद जगदाळे, डी. बी. पाटील, तारक अत्तार, जे. यु. कुलकर्णी, राजश्री ऐनापुरे, अर्चना जाधव आदी उपस्थित होते.

0 9 3 7 8 1
Users Today : 19
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *