जैनापूर ः येथे महाराष्ट्र शासन कृषी विभागामार्फत अधिकारी, कर्मचारी व शेतकरी प्रशिक्षण वर्गात बोलताना आमदार डॉ. राजेंद्र पाटील-यड्रावकर.
————
शेतकऱ्यांसाठी गावागावांत कार्यशाळा व्हाव्यात
आमदार राजेंद्र यड्रावकर : अधिकारी, कर्मचारी व शेतकरी प्रशिक्षण वर्ग
सकाळ वृत्तसेवा
दानोळी, ता. ४ ः बदलत्या व प्रतिकूल हवामानाच्या पार्श्वभूमीवर कृषी सहायकांनी शेतकऱ्यांच्या बांधावर मार्गदर्शन केले पाहिजे. शासकीय योजना तळागाळातील शेतकऱ्यांना मिळायला हव्यात. त्यासाठी सर्वांनी मिळून प्रत्येक महिन्याला तालुक्यातील गावागावांत कार्यशाळा घेऊन आणखी प्रयत्न केले पाहिजेत, असे प्रतिपादन माजी राज्यमंत्री आमदार डॉ. राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी उद्घाटनप्रसंगी केले.
ते जैनापूर येथील शरद कृषी महाविद्यालयामध्ये आयोजित महाराष्ट्र शासन कृषी विभाग, आत्मा यंत्रणा व शरद कृषी महाविद्यालय यांच्यातर्फे जिल्हा नियोजन समिती योजनेंतर्गत अधिकारी, कर्मचारी व शेतकरी प्रशिक्षण वर्ग कार्यक्रमात बोलत होते. अध्यक्षस्थानी जैनापूरच्या सरपंच श्रीमती संगीता कांबळे होत्या.
कृषिविज्ञान केंद्र, तळसंदेचे प्रमुख जयवंत जगताप यांनी ‘रब्बी हंगामातील पीक व्यवस्थापन’, शरद कृषीचे प्राचार्य शरद पाटील यांनी ‘मूरघास व चारा व्यवस्थापन’, विवेक पाटील यांनी ‘सेंद्रिय कर्ब याचे महत्त्व’ या विषयावर मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे नियोजन कृषी पर्यवेक्षक संजय सुतार यांनी केले. जयसिंगपूर मंडल कृषी अधिकारी दत्तात्रय आवारे, कुरुंदवाड मंडल कषी अधिकारी कुरुंदवाड शशिकांत कांबळे आदी उपस्थित होते. तालुका कृषी अधिकारी चंद्रकांत जागळे-पाटील यांनी प्रास्ताविक केले. प्रवीण बनसोडे यांनी सूत्रसंचालन केले. कृषी पर्यवेक्षक कमाल बाणदार यांनी आभार मानले.
शेतकऱ्यांसाठी गावागावात कार्यशाळा व्हाव्यात
0
9
3
7
8
1
Users Today : 19
Leave a comment