दारु पिऊन का आलात?’विचारत मुलाची वृद्ध बापाला लाथाबुक्क्यांनी मारहाण, वडिलांचा मृत्यू

Khozmaster
1 Min Read

अमरावती ते नागपूर महामार्गावरील नांदगावपेठ ठाण्याच्या हद्दीत शेंदोळा धस्कट गावात रविवारी (ता. तीन) क्षुल्लक वादातून मुलाने पित्याचा खून केल्याची खळबळजनक घटना घडली. नवरंग भुल्या भोसले (वय ७०, रा. शेंदोळा धस्कट), असे हत्या झालेल्या वृद्ध पित्याचे नाव आहे, अशी माहिती नांदगावपेठचे पोलिस निरीक्षक प्रवीण काळे यांनी दिली. रविवारी रात्री साडेआठच्या सुमारास ही घटना घडली.

फ्रेजरपुरा पोलिसांनी सोमवारी (ता. चार) प्यारन नवरंग भोसले (वय ६५) या महिलेच्या तक्रारीवरून मृत वृद्धाचा मुलगा नमन नवरंग भोसले (वय ३५) याच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करून त्याला ताब्यात घेतले. रविवारी सायंकाळी नवरंग भोसले हे बकऱ्या चारून घरी परत आले होते.

रात्री त्यांनी पत्नीला जेवणासाठी ताट वाढून मागितले. पत्नीने वाढलेल्या ताटावर पती जेवण करीत असताना अचानक मुलगा नमन घरी पोहोचला. पित्याला त्याने दारू पिऊन कसे आलात, याबाबत विचारणा केली. त्यावरून मुलगा आणि वडिलांमध्ये शाब्दिक चकमक उडाली.हा वाद वाढल्याने मुलगा नमन याने वृद्ध पित्यास लाथाबुक्क्यांनी जबर मारहाण केली. प्रकृती बिघडल्याने आसपासच्या लोकांनी वृद्ध पित्यास उपचारासाठी अमरावतीच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले. उपचारादरम्यान रात्री नवरंग भोसले यांचा मृत्यू झाला. सोमवारी (ता. चार) नवरंग यांची पत्नी प्यारन भोसले यांनी नांदगावपेठ ठाण्यात तक्रार नोंदविली

0 9 3 7 3 7
Users Today : 18
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *