Pune : स्कूल बसचा अपघात; ज्येष्ठ महिलेसह दोन विद्यार्थी जखमी

Khozmaster
2 Min Read

वाघोली : केसनंद वाडेबोलाई रोड वर स्कूल बस झाडाला धडकून भाजी विक्रेती ज्येष्ठ महिला गंभीर जखमी झाली तर दोन विद्यार्थीही जखमी झाले. तिघांवर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ही घटना सोमवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास घडली. रायझिंग स्टार स्कूलची ही बस होती. याप्रकरणी चालकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.          सीताबाई नारायण ढोरे ( वय 70,  रा केसनंद  ) ही भाजी विक्रेती महिला गंभीर जखमी झाली तर सोहम पोपट हरगुडे ( वय 11, रा केसनंद ) व आदित्य शिवाजी कोळी ( वय 11 रा .केसनंद ) हे दोन विद्यार्थी जखमी झाले. स्कूल सुटल्यानंतर मुलांना घरी सोडविण्यासाठी ही बस वाडेबोलाई येथे गेली होती. तिकडून परत असताना बस रोडच्या कडेला असणाऱ्या झाडाला धडकली. तेथे ढोरे या भाजी विकत होत्या.त्या या अपघातात गंभीर जखमी झाल्या. बसचा स्टेअरींग जाम झाल्याने बस  धडकल्याचे स्कूलच्या वतीने सांगण्यात येते. तर चालकाचा ताबा सुटल्याने बस धडकल्याचे नागरिक सांगतात. बस धडकताच आजू बाजूचे लोक मदतीला धावले व त्यांनी विद्यार्थ्यांना बसच्या बाहेर काढले.  तुकाराम जनार्दन पवार ( रा वाघोली  ) असे चालकाचे नाव आहे. अपघातानंतर बसवर असलेले शाळेचे नाव काळा रंग टाकून मिटविण्यात आले.

अपघातानंतर दीड तासाने रुग्णालयात

अपघात झाल्यानंतर विद्यार्थ्यांना तेथील हॉटेल मध्ये बसविण्यात आले. सुमारे 15 जन होते. शाळेचा स्टाफ दीड तासाने आला. त्यानंतर त्यांनी मुलांना घरी सोडण्याची तयारी केली. मात्र माझा मुलगा व अजून एक मुलगा जखमी असल्याने मी त्यांना रुग्णालयात घेवून आलो. असे जखमी मुलाचे पालक पोपट हरगुडे यांनी सांगितले.

बस कंत्राट दाराची होती. स्टेअरिंग जाम झाल्याने बस धडकली. यामध्ये विद्यार्थी जखमी झाले नाही. सुरक्षित राहिले. दुसरी बस मागवून मुलांना घरी सोडले. मात्र दोन मुलांना एका पालकाने रुग्णालयात नेले. त्यांची तब्येत व्यवस्थित आहे. त्यांनीही रुग्णालयातून डिस्चार्ज दिला जात आहे.

– सुनंदा वडजे, संचालक, रायझिंग स्टार स्कूल.

0 9 3 7 3 7
Users Today : 18
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *