Pune School Bus Accident : शाळेवरही पोलिसांनी कारवाई करावी; पालकांची मागणी

Khozmaster
1 Min Read

Wagholi News – शाळेच्या बस अपघात प्रकरणी केवळ चालकाला दोषी न धरता शाळेवरही कारवाई करावी अशी मागणी पालकांनी लोणीकंद पोलिसांकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे. वाघोलीतील रायझिंग स्टार स्कूलची ही बस होती.

चालकाचा बेजबाबदारपणा व भरगाव वेगाने बस चलविल्यामुळेच बसचा अपघात झाला. या अपघाताने मुलांच्या मनावर खूपच गंभीर परिणाम झाला आहे. मुले भीतीच्या छायेखाली वावरत आहे. यामुळे ते झोपत नसून सारखे रडत आहेत.

मुलांना प्रत्यक्ष जखमा नसल्या तरी मुकामार असण्याची शक्यता आहे. एका मुलावर खाजगी रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. तर एका मुलीला रात्रीच ताप आल्याने पालकांना मध्यरात्री रुग्णालयात दाखल करावे लागले.बससाठी लागणारे शुल्क शाळाच घेते. यामुळे ही जबाबदारी शाळेची आहे. बस वरील चालक ही वारंवार बदलला जातो. शाळेवर ही पोलिसांनी गुन्हा दाखल करावा असे या पत्रात म्हटले आहे. अपघातावेळी बस मध्ये असलेल्या मुलांच्या पालकांनी हे पत्र पोलिसांना दिले आहे.

दैव बलवत्तर म्हणून…

बस वेगाने असल्यामुळेच झाडाला धडकल्याचे  व्हिडीओत दिसून येते. बसची पुढील काच तुटून लांबवर गेली. मुले एकमेकांच्या अंगावर आदळली. नशीब मुले पुढील काचेतून बाहेर फेकली गेली नाहीत. तेथील ज्येष्ठ महिला गंभीर जखमी झाली. दैव बलवत्तर म्हणून मुले वाचली. अपघातानंतर शाळेचे कर्मचारी दीड तासाने आले. शाळा काय फक्त शुल्क घेण्यासाठीच आहे का ? असा संतप्त सवाल पालकांनी केला.

0 9 3 7 3 7
Users Today : 18
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *