पुणे – राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) गटाच्या नेत्या आणि राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांच्याबाबत सोशल मीडियावर अश्लील मजकूर प्रसारित केल्याप्रकरणी पुणे सायबर पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले आहे.
अश्लील मजकूर प्रसारित करणाऱ्या अन्य एका संशयिताची फेसबुक कंपनीकडून तांत्रिक माहिती घेण्यात आली. त्यानुसार वसंत रमेशराव खुळे (वय ३४, रा. रहाटी, ता.जि. परभणी) या संशयिताला २६ नोव्हेंबर रोजी रहाटीतून ताब्यात घेतले. तसेच प्रदीप कणसे या संशयितालाही ताब्यात घेऊन नोटीस बजावली आहे.
पोलिस आयुक्त रितेश कुमार, अतिरिक्त पोलिस आयुक्त (गुन्हे) रामनाथ पोकळे, आर्थिक व सायबर गुन्हे शाखेचे पोलिस उपायुक्त श्रीनिवास घाडगे, सहायक आयुक्त आर. एन. राजे आणि वरिष्ठ निरीक्षक मीनल सुपे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक स्नेहल आडसुळे, पोलिस उपनिरीक्षक विद्या साबळे, पोलिस अंमलदार संतोष जाधव, दिनेश मरकड, श्रीकृष्ण नागटिळक, उमा पालवे, सुनील सोनोने यांच्या पथकाने ही कारवाई केली.
Users Today : 19