Pune : भिगवण बारामती रस्त्यावर अपघात चार जण जखमी

Khozmaster
1 Min Read

शेटफळगढे : भिगवण-बारामती रस्त्यावर शेटफळगढे (ता इंदापूर) येथे दोन चार चाकी गाडींचा अपघातात चार जण जखमी झाले आहेत. त्यांना बारामती येथील महिला हॉस्पिटल ला उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. यामध्ये नागेश अनिल माने (वय २८) नागेश माने (वय ४ ) व प्रणाली नागेश माने (वय २४) हे जखमी झाले आहेत हे तीनही शेटफळगढे (ता इंदापूर) येथील आहेत तर १४ वर्षीय मुलगा जखमी झाला असून त्याला नाव सांगता येत नाही .

भिगवण बारामती रस्त्यावरील गायकवाड पेट्रोल पंपाशेजारी इको गाडी एमएच ४५ ए यु ३१५८ व स्विफ्ट एम एच ४३ एबी ६८०१ या दोन गाड्यांचा समोरासमोर अपघात झाला आहे. घटनेची माहिती मिळताच भिगवण पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले संबंधित जखमींना बारामती येथील हॉस्पिटलला पाठवण्यात आल्याची माहिती भिगवण पोलीस सूत्रांनी दिली तसेच साधारणतः १४ वर्षाच्या मुलाला स्वतःचे नाव सांगता येत नाही केवळ गावडे वस्ती सांगत आहे तरी सदर मुलगा कोण आहे याचा शोध पोलीस घेत आहेत
0 9 3 7 3 8
Users Today : 19
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *