हडपसर : परिसरात सध्या अवैध धंद्यांचा मोठ्या प्रमाणात सुळसुळाट माजला आहे. पोलिसांकडून होत असलेल्या दुर्लक्षामुळे हे सारे धंदे थेट चौक, रस्ते, शाळा अशा दर्शनी भागात हातपाय पसरू लागले आहेत.
त्यामुळे अनेक कुटुंबे व नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वेळोवेळी तक्रार करूनही त्याबाबत कारवाई होत नसल्याने नागरिकांकडून पोलिस प्रशासनाविषयी नाराजी व संताप व्यक्त केला जात आहे.
हडपसरसह मांजरी बुद्रुक, साडेसतरानळी, शेवाळवाडी, फुरसुंगी, केशवनगर आदी भागात ठीक ठिकाणी अवैध दारू धंदे बोकाळले आहेत. विशेषत: अमनोरा सिटी, जॉयविले या ठिकाणच्या लेबर कॅम्पच्या परिसरात मोठ्या प्रमाणात हातभट्टीची दारू, गांजा, बंटा यासारख्या नशिल्या पदार्थांची विक्री होत आहे.
Users Today : 19