गोकुळसिंग राजपूत सोयगाव :
कन्नड तालुक्यातील पिशोर पोलिस ठाण्यात नव्यानेच रुजू झालेले पुरस्कारीत नेमकाच त्यांना सिल्लोड येथे दि.३०/११/२३ रोजी प्रथमच राज्यस्तरीय ज्ञानपंख गौरव पुरस्कार सोहळा प्रतिष्ठान व आपले ज्ञानपंख वृत्तपत्राच्या मुख्य संपादक दशरथ सुरडकर व मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार देऊन सपोनि देवीदास वाघमोडे यांना गौरविण्यात आले आहे आणि बदली पिशोर पोलिस ठाण्यात झाली आहे.रुजू होताच पिशोर परिसरात आता येणाऱ्या नवीन वर्षाच्या दिवशी मद्यप्राशन करून भरधाव वेगाने वाहन चालविणाऱ्या चालकविरुद्ध कठोर कारवाई केली जाईल यासाठी पिशोर विविध ठिकाणी पोलीस पथक तैनात करण्यात येणार आहेत अशी माहिती नव्याने रुजू झालेले अवैध धंद्यावालांचे कर्दनकाळ पिशोर पोलिस ठाण्याचे सपोनि देवीदास बाळासाहेब वाघमोडे यांनी पिशोर पोलीस ठाण्यात आयोजित कार्यक्रमात बोलताना सांगितले आहे.सण उत्सव व नवीन वर्ष न नशा पाणी करता शांततेत साजरे करावेत कोणाला काही अडचण आल्यास थेट पिशोर पोलिस स्टेशन संपर्क साधावा.सण उत्सव, लग्न समारंभ
मिरवणुकीत कुणीही मद्यप्राशन करणार नाही याची काळजी नागरिकांनी घ्यावी असे आवाहन कर्दनकाळ असलेले सपोनि देवीदास वाघमोडे यांनी केले. मद्यपी वाहनचालक, स्टंटबाजी करताना आढळून आल्यास दंडात्मक कारवाई केली जाईल कोणत्याही प्रकारची गैय केली जाणार नाही.असा इशाराहि त्यांनी दिला आहे.
Users Today : 3