दारु बनविणेकामी उपयोगी पडणाऱ्या अवैध स्पिरीट वाहतूकीवर स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई , 585 लीटर स्पिरीटसह 10 लाख 04 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत..!!

Khozmaster
3 Min Read
प्रविण चव्हाण
 
नंदुरबार -: महाराष्ट्र लगत असणाऱ्या गुजरात राज्यात अवैधपणे दारुची वाहतूक होणार नाही तसेच अवैध दारुची तस्करी करणाऱ्यांची माहिती काढून त्यांचेवर कठोर कारवाई करणे बाबत सूचना नंदुरबार जिल्हा पोलीस अधीक्षक  यांनी गुन्हे बैठकीत सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकाऱ्यांना दिल्या होत्या.
दिनांक 06 दिसम्बर 2023 रोजी नंदुरबार जिल्हा पोलीस अधीक्षक  पी. आर. पाटील यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, म्हसावद ता. शहादा मार्गे धडगांव येथे एका पांढऱ्या रंगाच्या बोलेरो वाहनातून अवैध दारु बनविणेकामी उपयोगी पडणारे व मानवी शरीरास अपायकारक असलेले स्पिरीटची चोरटी वाहतूक करणार आहेत. त्यावरून  पोलीस अधीक्षक  पी. आर. पाटील यांनी सदर माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक  किरणकुमार खेडकर यांना देवून कायदेशीर कारवाई करणे बाबत आदेशीत केले.
मिळालेल्या बातमीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने म्हसावद पोलीस ठाणे हद्दीतील दरा गावाच्या पुढे उनपदेव फाट्‌याजवळ सापळा रचला. स्थानिक गुन्हे शाखेचे पथक म्हसावद गावाकडून येणाऱ्या वाहनांची तपासणी करीत असतांना सकाळी 10.30 वा. सुमारास एक पांढऱ्या रंगाचे मोठे चारचाकी वाहन भरधाव वेगाने येतांना दिसले, म्हणून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने हात देवून वाहन उभे करण्याचा इशारा दिला असता वाहन चालकाने वाहन न थांबविता भरधाव वेगाने पुढे निघून गेले, म्हणून पथकाला संशय आल्याने त्यांनी वाहनाचा पाठलाग केला. वाहन चालकाने सदरचे वाहन उनपदेव डॅम जवळ सोडून तेथून पळून गेले.
   सदरच्या वाहनाची तपासणी केली असता त्यात खालील वर्णनाचा व किमतीचा मुद्देमाल आढळून आला.
 2 लाख 04 हजार 750 रुपये किमतीच्या 09 प्लास्टीकच्या गोण्या त्यात प्रत्येकी 13 असे एकूण 117 पाऊच त्यात एकुण 585 लीटर दारु बनविणेकामी उपयोगी पडणारे स्पिरीट.
8 लाख रुपये किमतीची एक पांढऱ्या रंगाची महिंद्रा बोलेरो वाहन क्रमांक MH-12 EG-4773
असा एकुण 10 लाख 04 हजार 760 रुपये किमतीचा मुद्देमाल मिळून आल्याने कायदेशीर प्रक्रिया करुन सदरचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून वाहन सोडून पळून गेलेले संशयीत आरोपीतांविरुध्द् म्हसावद पोलीस ठाणे येथे गु.र.नं. 344/2023 भारतीय दंड विधान कलम 328 (मानवी शरीरास अपायकारक पदार्थ निर्मित करणे), महाराष्ट्र दारुबंदी कायदा कलम 65 (ई), 108 सह प्रमाणे महाराष्ट्र मोटार वाहन कायदा कलम 239 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच गुन्ह्यातील फरार आरोपीतांना लवकरच शोधून बेड्या ठोकण्यात येतील व त्यांचेविरुध्द् कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
   असे नंदुरबार पोलीस अधीक्षक पी.आर.पाटील यांनी सांगितले.
ही कारवाई नंदुरबार जिल्हा पोलीस अधीक्षक  पी.आर.पाटील, शहादा उप विभागीय पोलीस अधिकारी  दत्ता पवार यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक किरणकुमार खेडकर, म्हसावद  सहा. पोलीस निरीक्षक  राजन मोरे, पो ह. बहादुर भिलाला, पोलीस नाईक विकास कापुरे, पुरुषोत्तम सोनार, अविनाश चव्हाण, दादाभाऊ साबळे, योगेश कोळी, पोलीस अंमलदार दिपक न्हावी, अभिमन्यु गावीत यांच्या पथकाने केली आहे.
0 8 9 4 5 6
Users Today : 22
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *