दूकानांवर तात्काळ मराठी पाट्या लावा अन्यथा मनसे काळे फासणार.

Khozmaster
1 Min Read
तालुका प्रतिनिधी दत्ता हांडे देऊळगाव राजा.                                                                            महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळाच्या 12 जानेवारी 2022 रोजी झालेल्या बैठकीत महाराष्ट्र राज्यातील सर्व दुकानांचे नामफलक/पाट्या या मराठी भाषेमध्ये असणे बंधनकारक केले आहे सर्व आस्थापना दुकाने यांचे नामफलक मराठीमध्ये असणे अनिवार्य केले आहे महाराष्ट्र दूकाने व आस्थापना नोकरीचे व सेवा शर्तीची विनिमय सुधारणा अधिनियम 2022 च्या कलम 36,1 च्या कलम सहा अन्वये नोंदणी केलेल्या प्रत्येक दुकान आस्थापनाला कलम सात अनुसार दूकानांवर मराठी भाषेतून ठळक अक्षरात नामफलक लावणे बंधनकारक केले आहे परंतु अद्यापही यांची अंमलबजावणी करण्यात येत नाही त्यामुळे जे दुकानदार मराठीमध्ये नामफलक लावणार नाहीत त्यांच्या विरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने संबंधित नामफलकांवर काळे फासण्यात येईल असे निवेदन नगर परिषद ला देण्यात आले निवेदन देते समयी मनसे शहर अध्यक्ष बंडू राजे डोळस,शहर उपाध्यक्ष नवनाथ रामाणे, मनसेचे जेष्ठ नेते शेख शेहजाद भाई, आकाश डोळस, देवा चव्हाण, सत्यनारायण पावले, प्रसाद रामाने,शहर सचिव अशोक खरात, सचिन विधाते, कृष्णा ढोकरे, बालाजी मटोले,अजय मागंडे, आकाश जाधव, विकास टेकाळे, विठ्ठल वाघमारे, श्रावण नरोडे, इ . मनसे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते
0 9 3 8 1 5
Users Today : 12
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *