केंधळी येथील सकल मराठा समाजाच्या वतीने आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याबद्दल पोलिसात निवेदन.

Khozmaster
1 Min Read

गजानन माळकर पाटील जालना जिल्हा प्रतिनिधी मंठा.
मराठा आरक्षण योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्याबद्दल आक्षेपार्ह पोस्ट केल्याबद्दल मंठा तालुक्यातील केंधळी गावातील सकल मराठा समाज बांधवांच्या वतीने निषेध व्यक्त करण्यात आला. तसेच आक्षेपार्ह पोस्ट मुळे सकल मराठा समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. पोस्ट टाकणाऱ्यावर बरबडा येथील महादेव जावळे या व्यक्तीवर तात्काळ कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी निवेदनाद्वारे मंठा पोलीस ठाण्यात केली आहे. सदरील निवेदन पोलीस
निरीक्षक मारुती खेडकर यांनी स्विकारले. पोलिस उपनिरीक्षक बलभिम राऊत, पोलिस उपनिरीक्षक आसमान शिंदे, सतिश आमटे साहेब, आनंद ढवळे साहेब,शाम गायके साहेब,  यावेळी केंधळी येथील सकल मराठा समाज बांधवांची मोठ्या संख्येने उपस्थित होते याप्रसंगी पोलीस निरीक्षक मारुती खेडकर यांनी सांगितले की, आक्षेपार्य पोस्ट टाकणाऱ्यावर कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल. नागरिकांनी फेसबुक, व्हाट्सअप, इंस्टाग्राम ईतर माध्यमातून  सोशल मीडियाच्या माध्यमातून आक्षेपार्ह पोस्ट, मेसेज फॉरवर्ड किंवा टाकू नये, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *