विशेष प्रतिनिधी :
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) कारवाई करत बावधन पोलीस स्टेशनमधील महिला सहाय्यक पोलिस निरीक्षकाला ५० हजार रुपयांची लाच स्वीकारताना ताब्यात घेतले. या घटनेमुळे पोलिस विभागात खळबळ उडाली आहे.
या प्रकरणातील आरोपी महिला सहाय्यक पोलिस निरीक्षकाचे नाव Jyoti Pandurang Tambe असे आहे. त्या बावधन पोलीस स्टेशन येथे कार्यरत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार व त्यांच्या नातेवाईकांविरुद्ध बावधन पोलीस स्टेशनमध्ये दाखल असलेल्या गुन्ह्यात आरोपी अधिकारी या तपास अधिकारी म्हणून कार्यरत होत्या. संबंधित प्रकरणात मदत करण्यासाठी, नातेवाईकांना अटक न करण्यासाठी तसेच दोषारोपपत्र लवकर दाखल करण्यासाठी त्यांनी तक्रारदाराकडे ५० हजार रुपयांच्या लाचेची मागणी केल्याची तक्रार करण्यात आली होती.
तक्रार प्राप्त झाल्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पडताळणी करून सापळा रचला. त्यानुसार आरोपी महिला सहाय्यक पोलिस निरीक्षक यांना ५० हजार रुपयांची लाच स्वीकारताना ताब्यात घेण्यात आले.
या प्रकरणी पुढील कारवाई सुरू असून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून अधिक तपास करण्यात येत आहे.
Users Today : 10