लाॅकडाऊन नंतर प्रथमच मोलखेडा गावात पहिल्यांदाच पोहोचली लालपरी सरपंच वारांगणे,ग्रा.स.अतुल इंगळे यांनी मानले आगार प्रमुखचे आभार

Khozmaster
3 Min Read
छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत
सोयगाव तालुक्यातील मोलखेडा गावात लाॅकडाऊन लागल्यापासून बससेवा हि बंदच होती.त्यामळे विद्यार्थी व जेष्ठ नागरिक यांना नाहक त्रास सहन करावा लागत होता.सरपंच मनिषाताई ज्ञानेश्वर वारंगणे, ग्रामपंचायत सदस्य अतुल इंगळे व गावकऱ्यांनी वेळोवेळी सोयगाव येथे जाऊन हिरालाल ठाकरे आगार प्रमुख यांच्या कडे लेखी निवेदनाद्वारे निवेदन देण्यात आले आले ते शेवटी सेवानिवृत्त झाले पण विद्यार्थी यांची बस चालू करा म्हणून दाखल घेतली नाही.परंतु नव्यानेच रुजू झालेले आगार प्रमुख विजय काळवणे यांच्या कडे लेखी निवेदन देताच त्यांनी तात्काळ दखल घेऊन विद्यार्थी व जेष्ठ नागरिक यांची होणारी गैरसोय टाळली आणि तात्काळ दि.७/१२/२३ रोजी पासून मोलखेडा हून सकाळी एक बस सात वाजता तरी दुसरी साडेनऊ वाजता विद्यार्थ्यांसाठी चालू करुन दिली आहे.मोलखेडा गावात तब्बल तीन वर्षे नंतर बस पोहोचली. गुरुवारपासून बस सेवा सूरू झाल्याने यूवक आबालवृद्धांनी एकत्र येऊन जल्लोष साजरा केला.या दोन्ही बस सोयगाव ते सावळदबारा हून सोयगाव कडे जाताना मोलखेडा मागेॅ देवळगाव गुजरी, फत्तेपूर व सोयगाव जाईल.सोयगाव आगार बस सेवा  सूरू करण्यात आली आहे. देश स्वतंत्र होऊन ७६ वर्ष पूर्ण झाली. पण डोंगरकाठच्या आडवळणावर वसलेल्या गावांमध्ये बससेवा उपलब्ध नव्हती. गावात बस सेवा नसल्याने येथील ग्रामस्थ, रुग्ण, विद्यार्थी व विद्यार्थिनींना शालेय शिक्षणासाठी तारेवरची कसरत करावी लागत होती. या गावांमधील विद्यार्थी व विद्यार्थिनी  फत्तेपूर व सावळदबारा येथे ये-जा करतात. बस सेवा सुरू झाल्याचा फायदा दररोज शिक्षणासाठी ये-जा करणाय्रा शालेय विद्यार्थ्यांना झाला आहे. या भागात बस सेवा सुरु करण्यात यावी अशी मागणी सरपंच मनिषाताई ज्ञानेश्वर वारंगणे ग्रामपंचायत सदस्य अतुल इंगळे यांनी केली होती. गावांमधून फार मिळकत नसल्याचे कारण देत महामंळाने अनेकदा ही मागणी टोलावली होती.मागच्या महिन्यात सोयगाव येथील आगार प्रमुख विजय काळवणे आगारातील व्यवस्थापकांना पत्र देत सोयगाव,सावळदबारा येणाऱ्या दोन्ही बस वापसी सोयगाव कडे येताना मोलखेडा मागेॅ बस सेवा सुरू करण्याचे बजावले. अखेर गुरुवारी सोयगाव आगाराची सोयगाव ते सावळदबारा मागेॅ मोलखेडा, दोन टाईम बस सेवा सूरू करण्यात आल्याने ग्रामस्थांचा आनंद आभाळात टेकला आहे.याप्रसंगी सरपंच मनीषाताई ज्ञानेश्वर वारंगणे, सरपंचपती ज्ञानेश्वर वारंगणे, जेष्ठ समाजसेवक रामभाऊ रामचंद्र वारंगणे, स्वानंद पाटील,ग्रामपंचायत सदस्य
अतुल इंगळे,नामदेव लोहार,
निवृत्ती वरंगणे,निवृत्ती काळे,
निखिल पाटील,समाधान शिंगारे, वैभव गायकवाड,
 संतोष काळे,विशाल अंगाईत,
अमोल चौके,संतोष पाटील,
अनंता ताठे,गणेश गायकवाड, अमोल कळसकर, मयूर दाणे
आणि शाळेची मुले यांनी आगार प्रमुख विजय काळवणे यांचे आभार मानले.
0 9 3 8 2 0
Users Today : 17
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *