पुणे : पूर्वी महिलांना चूल आणि मूल एवढ्या परिघातच आपलं आयुष्य व्यतीत करावं लागत असे. महिलांना शिक्षणाचा मार्ग खुला झाला अन् हळूहळू महिला शिकू लागल्या. पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून विविध क्षेत्रात आपल्या कार्याचा ठसा उमटवू लागल्या..सामाजिक, राजकीय, कला, क्रीडा, सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्राबरोबरच शिक्षक, वकील, डॉक्टर, इंजिनियर या क्षेत्राबरोबरच उद्योग क्षेत्रातही अनेक महिला यशस्वीपणे आपला उद्योग सांभाळत असल्याचे दिसते. एका उच्चशिक्षित महिलेनं नोकरीच्या मागे न लागता स्वतःचा व्यवसाय उभारून महिलांपुढे आदर्श घालून दिला आहे.
पूजा रसाळ या बारामती तालुक्यातील देऊळगाव रसाळ या गावच्या रहिवासी आहेत. त्यांचं शिक्षण बीएससी अॅग्री झाले आहे. मात्र, या शिक्षणाच्या जोरावर नोकरीच्या मागे न लागता स्वतःचा व्यवसाय करण्याचे त्यांनी ठरवले. प्रत्येकाच्या घरात रोज लागणारा पदार्थ म्हणजे तेल.. मात्र हे तेल आरोग्यदायी कसं देता येईल, याचा विचार करुन त्यांनी लाकडी घाण्यापासून तेल बनवण्याचा व्यवसाय सुरू केला. रसाळ यांनी २०२१ साली हा व्यवसाय सुरू केला सुरुवातीला सात ते आठ लाख रुपये भांडवल गुंतवले. सध्या त्यांची यामध्ये २५ लाख रुपयांची गुंतवणूक असून गोवा राज्यसह महाराष्ट्रातील पुणे, मुंबई, नाशिक, अहमदनगर आदी भागातून तेलाला मोठी मागणी होत आहे. रसाळ यांना दरमहा सध्या ७० ते ८० हजारांचं उत्पन्न मिळत आहे.बाजारात मिळणाऱ्या रिफाइंड तेलापेक्षा लाकडी घाण्यातील तेल आरोग्यासाठी लाभदायक असते. बाजारात उपलब्ध असणाऱ्या अनेक रिफाइंड तेल बऱ्याचदा शरीराला हानिकारक असते. मात्र लाकडी खाण्यापासून बनवलेले तेल खाद्य तेलांबरोबरच मानवाच्या विविध आजारांवरही उपयुक्त असते, असं पूजा रसाळ म्हणतात.
‘रसाळ’ नावाने.. स्वतःचाच ब्रँड..
अनेकदा बऱ्याच नागरिकांना लाकडी घाण्यातील तेल उपलब्ध होत नाहीत. मात्र, दुर्मिळ होत चाललेल्या या लाकडी घाण्यातील तेलांना मोठी मागणी आहे. बचत गट विविध एक्जीबिशन मध्ये स्टॉल लावून या लाकडी घाण्यातील तेल लोकांपर्यंत पोहोचण्यास मदत झाली. त्यामुळेच ‘रसाळ’ नावाने तेलाचा ब्रँड तयार करून आज हजारो ग्राहकापर्यंत शेंगदाणा तेल,सूर्यफूल तेल,करडई तेल, खोबरेल तेल, मोहरी तेल, तीळ तेल, बदाम तेल पोहोचत आहे.पूजा रसाळ यांनी अॅग्रो हे फार्म कंपनी रजिस्टर केली आहे.त्या अंतर्गत तेल निर्मिती बरोबरच पशुखाद्यही चालू आहे. आहारामध्ये असणारा तेल हा घटक किती महत्त्वपूर्ण आहे आणि तो मनुष्याच्या ऐंशी टक्के वात प्रकृती असलेल्या आजारांना कारणीभूत आहे हे राजू दिक्षित सरांनी खूप चांगल्या प्रकारे समजून सांगितले आहे.. त्याचा परिणाम म्हणून आम्ही ७-८ वर्षांपासून स्वतः मिळेल तिथून लाकडी घाण्यावरचेच तेल खात होतो परंतु ते उपलब्ध होत नव्हते..आम्ही राजीव दीक्षित यांच्या प्रेरणेतून या तेल निर्मितीच्या व नॅचरल खाद्य निर्मिती व शेतातील पिकावर आधारित प्रक्रिया उद्योग याकडे वळलो असल्याचे रसाळ म्हणतात.
Users Today : 18