पुणे – पुणे-मुंबई यशवंतराव चव्हाण द्रुतगती महामार्गावर वडगाव आणि खंडाळा हद्दीत येत्या गुरुवारी (ता.७) दुपारी बारा ते दोन वाजेपर्यंत गॅंट्री बसविण्यात येणार आहेत. त्यामुळे या कालावधीत या महामार्गावरील अवजड वाहनांसह सर्व चारचाकी वाहनांसाठी वाहतूक बंदी करण्यात आली आहे. या कालावधीत ही वाहतूक अन्य मार्गाने वळविण्यात येणार असल्याचे महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने प्रसिद्घीपत्रकाद्वारे कळविले आहे.
हायवे ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टमअंतर्गत महामार्ग सुरक्षा विभाग केंद्र वडगाव आणि खंडाळा या दोन केंद्रांच्या हद्दीत ही गँट्री उभारण्यात येणार आहे. या कालावधीत मुंबई मार्गावरील सर्व प्रकारची अवजड वाहतूक आणि छोटी चारचाकी वाहने (कारसह ) किवळे पुलावरून जुन्या मुंबई -पुणे महामार्गावरून मुंबई दिशेकडे जातील आणि पुणे ते मुंबई या जुन्या महामार्गावरून येणारी सर्व प्रकारची वाहने ही कुसगाव टोल नाका येथून द्रुतगती महामार्गावर सोडली जाणार असल्याचे या प्रसिद्धिपत्रकात नमूद करण्यात आले आहे.
Users Today : 18