ललित पाटील प्रकरणी महिला अधिकाऱ्यासह दोघेजण बडतर्फ

Khozmaster
1 Min Read

पुणे – अमली पदार्थ तस्कर ललित पाटील याला ससून रुग्णालयातून पळून जाण्यास मदत केल्याप्रकरणी एका महिला अधिकाऱ्यासह दोघांना बुधवारी (ता. ६) शासकीय सेवेतून बडतर्फ करण्यात आले आहे. काही दिवसांपूर्वी या प्रकरणात दोन पोलिस कर्मचाऱ्यांना बडतर्फ करण्यात आले होते. या कारवाईमुळे शहर पोलिस दलात खळबळ उडाली आहे.पोलिस उपनिरीक्षक मोहिनी अविनाश डोंगरे आणि सहायक फौजदार रमेश जनार्दन काळे अशी बडतर्फ केलेल्या कर्मचाऱ्यांची नावे आहेत. ससून रुग्णालयातील वॉर्ड क्रमांक १६ मधील कैद्यांच्या सुरक्षेसाठी त्यांची नेमणूक केली होती. दोन ऑक्टोबर रोजी सायंकाळी ललित पसार झाला होता. या घटनेनंतर पोलिस आयुक्त रितेश कुमार यांनी कठोर भूमिका घेत ११ पोलिस कर्मचाऱ्यांना तातडीने निलंबित केले होते.

यापूर्वी २१ नोव्हेंबर रोजी पोलिस मुख्यालयातील नाथाराम भारत काळे आणि अमित सुरेश जाधव या दोन कर्मचाऱ्यांना शासकीय सेवेतून बडतर्फ करण्यात आले होते. त्यानंतर बुधवारी सायंकाळी डोंगरे आणि काळे यांना बडतर्फ करण्याचे आदेश काढण्यात आले.

0 9 3 7 3 8
Users Today : 19
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *