संचालकांच्या आश्वासनानंतर माजी सैनिकांचे उपोषणास्त्र मागे

Khozmaster
1 Min Read

कॅन्टोन्मेंट : माजी सैनिकांसाठीची वेबसाईट 26 फेब्रुवारी, 2024 पर्यंत राज्यभर सुरू होईल, युनियनविषयी आणि २०१९ साली ध्वजनिधी अनधिकृतरित्या खर्च करणाऱ्याची चौकशी अशा विविध मागण्यांचे निवेदन उपोषणस्थळी स्वीकारले.त्याचा शासनाकडे पाठपुरावा केला जाईल, असे आश्वासन सैनिक कल्याण अधिकारी निवृत्त ब्रिगेडियर राजेश गायकवाड यांनी दिल्यानंतर माजी सैनिकांनी उपोषण मागे घेतले. याप्रसंगी जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी निवृत्त लेफ्टनंट कर्नल एस. डी. हंगे आणि उपोषणकर्ते अॅड. संजय शिरसाट,विनोद परदेशी, डॉ. मुरुडकर,, दिलीप हिरे, आनंद ठाकूर, बाळासाहेब जाधव बाळासाहेब शेवाळे, बाळासाहेब जाधव कॅप. शिंदे, सुनील काळे, दिपक शिर्के, तुकाराम डफळ, बी. जी. पाचारणे, पोपटराव ढोकले, पुष्पा मुंडे, संगीता पाटील,संदीप शेलार, अध्यक्षा मीना तांगडे, उपाध्यक्षा अलका शिंदे, अर्चना नेब, वीर नारी स्मिता बुरूटे, सचिव अर्चना मोरे आणि वरील सर्वगुण माजी सैनिक उपस्थित होते , तर सबंध महाराष्ट्रातील सर्व माजी सैनिक संघटनांनी पाठींब्याची पत्रे पाठवून पाठींबा दिला होता.गायकवाड म्हणाले की,एकट्या पुणे जिल्ह्यामधे माजीसैनिकांची संख्या एक लाखाहून अधिक आहे, त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी महत्त्वाची अडचण जागेसंदर्भात येत आहे. त्यासाठी विभागीय आयुक्त सौरभ राव आणि जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्याकडे कार्यालयासाठी जागेची मागणी केली आहे.

0 9 3 8 2 1
Users Today : 18
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *