पुणे विद्यापीठात पुन्हा मोफत बस सेवा सुरू

Khozmaster
2 Min Read

पुणे – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील परिसरात ये-जा करण्यासाठी विद्यापीठाच्या वतीने मोफत बस सेवा सुरू करण्यात आली आहे. सकाळी साडे दहा वाजता ही सेवा सुरू होणार आहे. विद्यापीठ परिसरातील सर्व महत्त्वाच्या ठिकाणी विद्यार्थी आणि नागरिकांना पोचण्यासाठी ही सेवा असणार आहे. या सेवेमुळे विद्यापीठात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना आणि कामानिमित्त येणाऱ्या नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.विद्यापीठाचा परिसरातील विद्यार्थी, प्राध्यापक, सेवक आणि नागरिकांसाठी विद्यापीठ प्रशासनाने ही सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. या सेवेसाठी विद्यापीठात दोन बस असणार आहेत. मुख्य प्रवेशद्वारापासून ही सेवा उपलब्ध होणार असून विद्यापीठातील सर्व प्रमुख विभाग आणि कार्यालये असे जवळपास १३ बसथांबे आहेत.विद्यार्थी आणि नागरिकांचा प्रतिसाद पाहून येत्या काळात बस थांब्यांच्या संख्येत वाढ करण्यात येणार आहे. तसेच ठिकठिकाणी याबाबत फलकही लावण्यात येणार आहेत. याशिवाय येत्या काळात बससेवेसाठी स्वतंत्र ॲप्लिकेशनही विकसित करण्याचा विद्यापीठ प्रशासनाचा मानस आहेविद्यापीठातील बसथांबे –विद्यापीठाचा मुख्य प्रवेशद्वार, छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा, जयकर ज्ञानस्त्रोत केंद्र (जयकर ग्रंथालय), रसायनशास्त्र विभाग, परीक्षा विभाग, आंतरराष्ट्रीय केंद्र, मुख्य इमारत, तंत्रज्ञान विभाग, मुलींचे वसतीगृह, आरोग्य केंद्र, पुंबा, मुलांचे वसतीगृह, मुख्य प्रवेशद्वार.बसचे वेळापत्रक :सकाळी १०.३० पासून दर अर्ध्या तासाला‘या सेवेमुळे विद्यार्थी, प्राध्यापक, सेवक आणि नागरिकांना निश्चित मदत होणार आहे. हा प्रवास अधिक सुलभ व्हावा यासाठी विद्यापीठातर्फे स्वतंत्र अॅप तयार केले जाणार आहे. या ॲपद्वारे बस नेमकी कुठे आहे, किती वेळात कोणत्या थांब्यावर पोचेल, याची माहिती मिळणार आहे.’- डॉ. सुरेश गोसावी, कुलगुरू, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ‘याआधी विद्यापीठात आलेले विद्यार्थी, नागरिक यांना खूप पायपीट करावी लागत. आता विद्यापीठ प्रशासनाने दोन सीएनजी बसद्वारे ही सेवा सुरू केली आहे.’- डॉ. विजय खरे, प्रभारी कुलसचिव, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ

0 9 3 8 2 4
Users Today : 21
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *