खडकपूर्णा धरणात अर्धनग्न आंदोलन

Khozmaster
2 Min Read
देऊळगांवराजा प्रतिनिधी राजेश पंडित .
 केंद्र सरकार पुरस्कृत प्रधानमंत्री किसान सन्मान योजना (पीएम किसान) योजनेचे बायगाव खुर्द तालुका देऊळगाव राजा येथील 295 शेतकऱ्यांचे गेल्या 20 महिन्यापासून प्रत्येकी 2000 प्रमाणे पाच हप्त्याचे 10000 व महाराष्ट्र सरकारचे (नमो) किसान योजनेचे 2000 असे प्रत्येकी 12 हजार रुपये प्रमाणे 35 लक्ष 40 हजार रुपये शासन कर्मचारी व अधिकारी यांच्या निष्काळजीपणामुळे शासनाकडे थकीत आहे हे शेतकरी पीएम किसान लाभापासून वंचित आहे याकरिता शेतकरी संघटनेच्या वतीने दिनांक 29.3.23 रोजी माननीय तहसीलदार देऊळगाव राजा यांना निवेदन देण्यात आले व 11.4.23 रोजी 179 शेतकऱ्यांनी तहसील कार्यालय देऊळगाव राजा येथे आमरण उपोषण केले दिनांक 28.4.23 रोजी माननीय तहसीलदार यांना स्मरणपत्र दिले दिनांक 30.7.23 रोजी या मतदारसंघाचे आमदार माजी मंत्री डॉक्टर राजेंद्र शिंगणे यांना निवेदन दिले दिनांक 17.8. 23 रोजी माननीय जिल्हाधिकारी बुलढाणा यांचे मार्फत माननीय पंतप्रधान नवी दिल्ली यांना निवेदन पाठवले दिनांक 27.9.23 रोजी महाराष्ट्र राज्य कृषी मंत्री माननीय धनंजय मुंडे यांना मुंबई येथे जाऊन निवेदन दिले दिनांक 17.10.23 रोजी खडकपूर्णा जलाशयात बायगाव खुर्द येथे 55 शेतकऱ्यांनी मारुती मंदिराच्या पाठीमागे अर्धनग्न आंदोलन केले होते प्रत्येक वेळेस फक्त आश्वासन देण्यात आले परंतु शासनाच्या निषेध म्हणून आज रोजी 43 शेतकऱ्यांनी पुन्हा पाण्यात बसले आहेत शेतकरी संघटनेचे देऊळगावराजा तालुका अध्यक्ष तेजराव मुंडे यांच्या नेतृत्वात आज दिनांक 7.12.23 रोजी दुपारी एक वाजता पासून शंभर फूट पाण्यात आंदोलन बसले यामध्ये संतोष गाढवे, शेणफड जाधव ,प्रेम पाटील गाढवे उपसरपंच. कचरूभा कदम, राजू शेरे ,कारभारी गावंडे, सुरेश टेकाळे ,विजय बिबे, विकास कदम, रामदास दहातोंडे, प्रल्हाद टेकाळे ,भगवान जायभाये, प्रकाश गाढवे ,जगन मांडे ,शंकर नागरे ,नरहरी खारडे, प्रकाश जायभाये,गजानन नागरे इत्यादी जवळपास 50 शेतकरी उपस्थित होते आहेत माननीय तहसीलदार. धनमाने साहेब देऊळगाव राजा तलाठी हांडे साहेब. पोलीस स्टेशन अंधेरा यांच्या वतीने राठोड साहेब. व कर्मचारी उपस्थित होते तहसीलदाराच्या वतीने आश्वासन देण्यात आली की दोन दिवसात पूर्ण शेतकऱ्यांच्या याद्या करून शासनाला पाठवल्या जातील प्रत्येक शेतकऱ्याला पी एम किसान योजनेचा लाभ देण्यात येईल आशा आश्वासन महाराष्ट्र शासन तहसीलदार यांच्या वतीने देऊन आंदोलन स्थगित करण्यात आले
0 9 3 8 2 4
Users Today : 21
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *