Pune News : WhatsApp ग्रुपमधून काढल्याचा राग, पुण्यातील कर्मचाऱ्याची बॉसला मारहाण, iPhone ही फोडला

Khozmaster
1 Min Read

पुणे : कंपनीच्या बॉसने व्हॉट्सअप ग्रुपमधून बाहेर काढल्याने कर्मचाऱ्याला राग अनावर झाला. त्यामुळे संबंधित कर्मचाऱ्याने बांबूने कंपनी अधिकाऱ्याला बेदम मारहाण केल्याचा आरोप आहे. इतक्यावर न थांबता बॉसचा महागडा आयफोनही तोडून नुकसान केल्याचं समोर आलं आहे. पुण्यातील चंदननगर भागात हा प्रकार घडल्याची माहिती आहे.
चंदननगर परिसरातील एका कंपनीत काम करत असलेल्या कामगाराबाबत ग्राहकांच्या खूप तक्रारी येत होत्या. त्यामुळे त्याला कंपनीच्या अधिकाऱ्यांनी व्हॉट्सअप ग्रुपमधून बाहेर काढले. याचा राग संबंधित कामगाराला आला. त्याने बांबू घेऊन येत कंपनीच्या अधिकाऱ्यास बेदम मारहाण केली. त्यांचा आयफोन तोडून नुकसानही केल्याचा प्रकार घडला आहे.

याप्रकरणी आरोपी सत्यम शिंगवी याच्यावर चंदननगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. याबाबत अमोल शेषराव ढोबळे (वय- ३१, रा. लोहगाव, पुणे) यांनी आरोपी विरोधात पोलिसांकडे तक्रार दिली आहे.तक्रारदार अमोल ढोबळे यांच्या इन्स्टा गो प्रा. लि कंपनीत आरोपी सत्यम शिंगवी हा कामास होता. त्याच्या विरुद्ध अनेक ग्राहकांच्या भरपूर तक्रारी येत असल्या कारणाने तक्रारदार यांनी त्यास समजवून सांगण्यासाठी फोन कॉल केला होता. परंतु आरोपीने सदर कॉल उचलला नाही. त्यामुळे तक्रारदार यांनी त्यास व्हॉट्सअप ग्रुपमधून रिमूव्ह केले.
0 9 3 7 3 8
Users Today : 19
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *