मंचर – पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावर पेठ (ता.आंबेगाव) येथे गुरुवारी (ता.७) पहाटे आराम बसने पुढे उभ्या असलेल्या माल ट्रकला धडक दिली. झालेल्या अपघातात बसमधील ४३ प्रवासी जखमी झाले आहे.
जखमींवर प्राथमिक उपचार मंचर येथील उपजिल्हा रुग्णालय व गंभीर जखमींना पिंपरी चिंचवड येथील यशवंतराव चव्हाण हॉस्पिटलमध्ये नेण्याची व्यवस्था मंचर पोलीस व ग्रामस्थांनी केली. सर्व जखमी नेपाळचे यात्रेकरू भाविक आहेत.
मालट्रक (एम.पी०९ एम.एच ४२३१) हा पुण्याकडे जात होता. काही वेळ रस्त्याच्या कडेला उभा होता. मंचर मार्गे पुण्याच्या दिशेने आराम बस (एम.एच १९ वाय ५४६५) जात होती. ट्रक उभा असल्याचे बस चालकाच्या लक्षात आले नाही. ट्रकच्या मागील बाजूस बसची धडक बसली. झोपेत असलेल्या बसमधील प्रवाशांना जोरदार धक्का बसल्याने जाग आली. प्रवाशांनी आरडाओरडा केला. परिसरात राहणारे ग्रामस्थ व ये-जा करणाऱ्या वाहनातील नागरिक मदतीसाठी धावून आले. पोलीसही घटनास्थळी आले त्यानंतर मदत कार्याला वेग आला.
जखमींची नावे – दीपेश परिहार (वय १८), राम परिहार (वय २०),हुकुमा ओली (वय ४९), दीपासिंग ठाकूर (वय ३८) ,अमित रोका (वय २०), दीपा सुनार (वय २२) ,ममता ओली (वय १८), टीका श्रेष्ठा (वय २५), करुणा बुधा (वय ३०), संजना केसी (वय २३), निभा केसी (वय २०),रोहित चौधरी (वय १६) ,प्रदीप डांगी (वय १७) ,अर्जुन विश्वकर्मा (वय २७), शांता विश्वकर्मा (वय ३०), खुर्ना मल्ला (वय ४०), बिबास दानी (वय १९) ,विनोद बी के (वय २०),मनबहादूर खत्री (वय ३०), अनिता सुनार (वय २३) ,गंगाधर कश्चप (वय ५३),शबाना थापा (वय २७) ,आयुष् सोनल (वय ११) ,गायत्री ओली (वय २६) ,दिनेश बश्नीत (वय २०), रोशन बसैल (वय २५), रोशन परिहार (१८) ,सुशीला नेवार (वय २४), सौरू भुसाल (वय २४), कल्पना विश्वकर्मा (वय २४), बेबीता रोंका (वय ३०), संतोष खत्री (वय २०) ,शबाना केसी (वय ४०) , पियुष विश्वकर्मा (वय७), संत्रीरा सुनाट (वय २८) ,नोबित विश्वकर्मा (वय २८) वर्षा मल्ला (वय ३), ममता ओली (वय १८), दीप खत्री (वय ९),पार्वती रोका (वय ३८), पूर्णकला कौर (वय २३), मालट्रक चालक गोरेलाल सोलंकी (रा.राजपूर मध्यप्रदेश) व अन्य जखमींची नावे समजली नाही.
घटनास्थळी मंचर पोलिसांनी भेट देऊन पंचनामा केला आहे., आरामबस चालक शांता रामसिंग (रा.सोलन हरियाना) व आराम बसमधील जखमी प्रवाशाचे जबाब घेण्यासाठी मंचर पोलिसांचे यशवंतराव चव्हाण हॉस्पिटल मध्ये गेले आहे.
Users Today : 22