Nagpur: इसासनी-हिंगणा रस्ता मृत्यू मार्ग होतोय का ? ३५ अपघातांमध्ये १३ जणांचा मृत्यू

Khozmaster
1 Min Read

Nagpur News: लोकमान्यनगर मेट्रो स्टेशन ते इसासनी या मार्गावर गेल्या दहा वर्षांमध्ये एकूण ३५ अपघात झाले असून त्यात १३ जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक बाब पुढे आली. या भागातील रहिवाशांनी याचिकाकत्यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठामध्ये ही याचिका दाखल केली. न्यायालयाने याची दखल घेत सर्व प्रतिवाद्यांना नोटीस बजावत सहा आठवड्यात उत्तर दाखल करण्याचे आदेश दिले आहे.

जितेंद्र मेश्राम, सतिश कन्हेरकर, देवेंद्र दायरे आणि मंगेश लोखंडे, असे रहिवासी याचिकाकर्त्यांची नावे आहेत. न्यायमूर्ती नितीन सांबरे आणि न्यायमूर्ती अभय मंत्री यांच्या समक्ष सुनावणी झाली. याचिकेनुसार, लता मंगेशकर रुग्णालयासमोरील

इसासनी – हिंगणा रस्त्याचे रुंदीकरण नियमानुसार केले जात नाही. रस्त्यावर अनेक ठिकाणी अतिक्रमणे झाली असून ही अतिक्रमणे न हटवता रस्ता रुंदीकरणाचे काम सुरू असल्याने केवळ १५ मीटर रस्ता वाहतुकीसाठी शिल्लक आहे. त्यामुळे, रस्त्यावरील जीवघेण्या अपघातांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. इसासनी मार्गावरील नियमित वाहतूक आणि रस्त्याच्या चुकीच्या बांधकामामुळे रुग्णवाहिकेला लता मंगेशकर

रुग्णालयापर्यंत जाण्यासाठी जागा मिळत नसल्याचा दावा याचिकाकर्त्यांनी केला आहे. त्यामुळे, इसासनी व हिंगणा रस्त्यावरील वाहतूक सुरळीत व्हावी व अतिक्रमण हटवून रस्ता रुंदीकरण करावे, अशा मागण्यांचे निवेदन याचिकाकत्यांनी प्रशासनाला दिले होते. याचिकाकर्त्याने गेल्या दहा वर्षात (२०१३ ते २०२३) या मार्गावर झालेल्या अपघाता विषयीची माहिती माहितीच्या अधिकाराखाली मागविली होती

0 9 3 7 4 1
Users Today : 22
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *