असंवेदनशील सरकारला शेतक-यांची काळजीच उरली नाही – दिलीप भोजराज हल्लाबोल मोर्चात मोठया संख्येने सहभागी व्हा – राहुलभाउ बोंद्रे

Khozmaster
3 Min Read
चिखली:  दि. 08 डसेंबर 2023
लहरीपणामुळे पाउस आलाच नाही, आणि आला तेव्हा होत्याचं नव्हतं करून गेला. शेतक-यांच्या हातची सोयाबीन, तुर,हरबरा,खरीप व रब्बी हंगामाची पिके नष्ट झाल्याने शेतक-यांवर आभाळ फाटलं. मागिल वर्षीची अतिवृष्टीची मदत तसेच पिक विम्याच्या पैषापासुन शेतकरी वंचित असुन राज्यातील हुकूमषाही पध्दतीने कारभार करणा-या दळभद्री सरकारला सर्वसामान्य जतना कंटाळली असल्याचे प्रतिपादन करीत बुलडाणा जिल्हा कॉग्रेस कमिटीचे अध्यक्ष माजी आमदार राहुलभाउ बोंद्रे यांनी नागपुर विधान भवनावर येत्या 11 डिसेंबर रोजी होणा-या हल्लाबोल मोर्चात मोठया संख्येने सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. तर राज्यातील असंवेदनषील सरकारला शेतक-यांची काळजीच उरली नसल्याचा स्पष्ट आरोप वाषिम येथुन हल्लाबोल मोर्चाच्या नियोजन आढावा बैठकीला प्रमुख पाहुणे म्हणुन बोलतांना विधानसभा निरीक्षक दिलीप भोजराज यांनी यावेळी केला.
शेतक-यांच्या विविध अडचणी व मागण्या घेवुन महाराष्ट्र प्रदेष कॉग्रेस कमिटीच्या वतीने येत्या 11 डिसेंबर 2023 रोजी हिवाळी अधिवेषनात नागपुर येथे विधान भवनावर विराट हल्लाबोल मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. हल्लाबोल नियोजन आढावा बैठक प्रसंगी चिखली विधानसभा निरीक्षक दिलीप भोजराज म्हणाले की, सर्वसामान्य जनता भाजपा सरकारच्या गलथान कारभाराला कंटाळली आहे. शेतकरी, शेतमजुर, सर्वसामान्य नागरीक, सुषिक्षीत बेरोजगार, यांचा केंद्र व राज्यातील भाजपा सरकारमुळे भ्रमनिरास होत आहे. कुंभकर्णी झोपेत असलेल्या या सरकारला जागे करण्याकरीता येत्या 11 डिसेंबर रोजी नागपुर विधान भवनावर विराट हल्लाबोल मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. याप्रसंगी मोठया संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करून मोर्चा संदर्भात आपल्या भाषनातून सविस्तर माहिती विषद केली.
केंद्र व राज्यातील मोदी सरकारला सर्वसामान्यांसह शेतक-यांचे सोयरसुतक उरले नसल्याचे सांगुन माजी आमदार राहुलभाउ बोंद्रे पुढे म्हणाले की, राज्यातील एक फुल दोन हाफ या सरकारने शेतक-यांच्या तोंडाला पाने पुसली आहेत. त्यांना शेतक-यांच्या अडचणी दिसत नाही, देषातील लोकषाही टिकविण्याकरीता हुकूमषाही विरूध्द लढा देण्यासाठी एकसंघ होणे गरजचे असल्याचे सांगित कॉग्रेसकडे असलेली निस्वार्थी व निष्टावंताची फळी हीच कॉग्रेसची खरी ताकद असल्याचे राहुलभाउ म्हणाले. या नियोजन आढावा बैठक प्रसंगी भुमीमुक्ती मोर्चाचे भाई प्रदिप अंभोरे,जि.प.सदस्य रिजवान सोैदागर, पंचायत समितीचे माजी सभापती जगन्नाथ पाटील, अषोकराव पडघान, विष्णु पाटील कुळसुंदर, कृषीमित्र सचिन बोंद्रे, कृउबास सभापती डॉ. संतोष वानखेडे आदिंची समयोचित भाषने झाले.
यावेळी नियोजन बैठक प्रसंगी व्यासपिठावर चिखली तालुका कॉग्रेसचे अध्यक्ष समाधान सुपेकर, बुलडाणा तालुका कॉग्रेसचे कार्याध्यक्ष नंदु षिंदे, शहर अध्यक्ष अतहरोद्यीन काझी, विष्णु पाटील कुळसुंदर, भाई प्रदिप अंभोरे, सभापती डॉ. संतोष वानखेडे, डॉ.सत्येंद्र भुसारी, ज्ञानेष्वर सुरूषे, जगन्नाथ पाटील, अषोकराव पडघान, कुणाल बोंद्र्रे, सचिन बोंद्रे, रिजवान सौदागर, गाजी बाबा, सरपंच मनोज लाहुडकार, विजय पाटील शेजोळ, डॉ. संजय घुगे, सेवादलचे रामेष्वर भुसारी, गजानन लांडे पाटील, संजय गवई, प्रभाकर वाघ, बंडुभाउ कुळकर्णी, सत्तार पटेल, तात्या हेलगे, रामधन मोरे, अजीसखॉ बाबेखॉ, सुनिल कासारे यांची उपस्थिती होती. तर चिखली विधानसभा मतदार संघातुन विविध गावचे सरपंच, उपसरपंच, सदस्य, विविध सेल व विभागाचे पदाधिकारी तसेच कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते. या नियोजन बैठकीचे संचलन तालुका कॉग्रेसचे अध्यक्ष समाधान सुपेकर यांनी तर आभार प्रदर्षन कॉग्रेस पर्यावरणचे जिल्हाध्यक्ष विजय पाटील शेजोळ यांनी केले. यावेळी राजपुत करनीसेनेचे अध्यक्ष सुखदेवसिंह गोगामेडी राज्यस्थान यांना सामुहीक श्रध्दाजंली अर्पण करण्यात आली. तर बैठकीचा समारोप सामुहिक राष्ट्रगिताने करण्यात आला.         

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *