वसई भुमी अभिलेख चा अजब कारभार चक्क नैसर्गिक नाला नकाशावरून गायब…

Khozmaster
2 Min Read
शिवसेना पदाधिकारी यांनी महानगरपालिकेत आयुक्तांना घेराव घालत  घातला राडा.
         नालासोपारा शहरातील उमराळे समेळपाडा, परिसरातून वाहणारा नैसर्गिक नाला चक्क नकाशावरून गायब झाला आहे.
समेळपाडा येथिल  रहिवासी भाग वाढत चाललेला आहे. ज्यांनी नालाकाठी जागा घेतल्या, त्यांनी आपल्या आवश्‍यकतेप्रमाणे जागा वाढवून नाल्याचे पाणी वळविले.
काहीनी चक्क नालाच बुजवुन त्याजागी बांधकाम केले आहे
भुमाफीया यांनी  जमिनीवर नैसर्गिक नाला बुजवून त्या ठिकाणी नालाच नसल्याचे बनावट नकाशे व दस्ताऐवज भूमीअभिलेख कार्यालयातील संबंधित अधिकारी व कर्मचारी यांच्याशी संगनमत करून तयार करुन घेत ते खरे असल्याचे भासवून महापालिकेची  फसवणूक केली. असल्याचे निदर्शनास येत आहे.
भूमीअभिलेख कार्यालयातील मोजणी करणाऱ्या कोणत्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी संगनमत केले व मध्यस्थी म्हणून कोणाचा सहभाग आहे, याचा तपास करण्यात यावा व कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी शिवसेना महिला शहर प्रमुख रूचिता नाईक यांनी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्याकडे केली आहे.
वास्तविक अंतिम लेआउट मंजूर करताना स्थळपाहणी करून मंजुरी देणे बंधनकारक आहे. महापालिकेच्या नगररचना विभागाच्या अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष स्थळपाहणी न करता कार्यालयात बसूनच भुमाफीया यांना  लेआउटला मंजुरी दिली आहे.
महापालिका नगर रचना विभागाचे अधिकारी व भुमी अभिलेख चे अधिकारी यांनी भुमाफीया यांचा आर्थिक फायद्यासाठी नकाशावरून नाला गायब करणे व पाहणी न करता बांधकाम करण्यास परवानगी देवून कायदेभंग केला आहे.
यावेळी नगर रचना विभागाचे रेड्डी यांना विचारणा केली असता त्यांनी हात झटकत उडवाउडवीचे उत्तर देऊन  भुमी अभिलेख यांच्या नकाशावरून आम्ही बांधकाम परवानगी दिली असल्याचे सांगितले.
नैसर्गिक नाल्याचे रूपांतर नाली मध्ये झाले असुन सांडपाणी साचले आहे व येणारया पावसाळ्यात उमराळे, समेळपाडा व साई नगर परिसर पाण्याखाली जाणार असल्याची नागरीकांकडुन चिंता व्यक्त केली जात आहे.
याबाबत विचारना केली असता आयुक्तांसमोर नगर रचना विभागाचे रेड्डी व प्रदीप पाचंगे यांच्या सोबत शिवसैनिकांनी राडा घातल्याने वातावरण गरम झाले होते.
आयुक्तांनी कायदा हातात न घेता मॅरोथॉन स्पर्धा थांबवु नये योग्य ती कार्यवाही करून दोषींवर कठोर कारवाई करण्याचे आश्वासन दिले.
     यावेळी शिवसेना महिला आघाडी शहर संघटक रूचिता नाईक, उपशहरप्रमुख महेश निकम, विभाग प्रमुख दानिश करारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *