आता ढगाळ वातावरण पावासा अभावी खरीप गेले; रब्बीचे पिके धोक्यात साहेब सांगा शेती करावी गेल्या वर्षीच्या सततच्या पावसाच्या अनुदानापासून तालुक्यात बरेच शेतकरी वंचित

Khozmaster
2 Min Read
छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत
सोयगाव तालुक्यात व सावळदबारा परिसरात यावर्षी जिल्यात झालेला अत्यत्य पाऊसामुळे शेतकऱ्यांना खरीप पिकाच्चा चांगलाच फटका बसला कमी पर्जन्यमानामुळे पाणी पातळीत वाढ इशाली नाही. तरीही शेतकऱ्याने हार न मानता नव्याने रब्बी पिकासाठी आपले कंबरडे कसून ज्वारी, हरभरा, गहू पिकांची पेरणी केली. खरी पण गेल्या आठवड्याभरापासून ढगाळ वातावरण व अवकाळी पावसाने शेतात उभी असलेली तुर, कांदा, ज्वारी, हरभरा, गहू पिके या वातावरण बदलामुळे रोगराईच्या गराड्यात सापडली आहेत.
“पाऊस न पडल्यामुळे खरीप गेलं आणि आता अवकाळी पावसाने रब्बे जातय दुष्काळाच्या गडद छायेत अडकलेल्या शेतकन्यांमधून, “साहेब सांगा शेती करू कशी?
असाच प्रश्न विचारला जात आहे.” कारण सोयाबीननंतर तूर या पिकावर शेतकऱ्यांची भिस्त आहे. यंदा तुरीला चांगला बाजारभाव ही असल्याने तूर उत्पादनामधून शेतकऱ्यांना मोठ्या अपेक्षा निर्माण झाल्या आहेत. पण ऐन शेंगा भरण्याच्या आवश्यक असताना तुरीवर अळीचा प्रादुर्भाव वाढत चालला आहे, यामुळे पीक धोक्यात सापडले आहे. गेल्या वर्षी देखील परतीच्या पावसामुळे, सोयगाव तालुक्यात व सावळदबारा परिसरात शेतकऱ्यांच्या तूर पिकाचे नुकसान झाले होते. आणि यावर्षी शेंगा पोखरणाऱ्या अळीमुळे उत्पन्नात मोठ्या प्रमाणात घट होण्याची शक्यता आहे. त्याबरोबरच तीन ते चार दिवसांपासून असलेले ढगाळ वातावरण पुन्हा शेतकऱ्यांची चिंता वाढवत आहे. ढगाळ वातावरणामुळे हरभरा पिकावर अळी, मर व इतर किडींचा प्रादुर्भाव दिसून पेत आहे. या रोगांच्या नियंत्रणासाठी फवारणी करण्यासाठी शेतकऱ्यांना आर्थिक भुर्दड सोसावा लागत आहे.
▪️ कृषी विभागाने तातडीने लक्ष देण्याची गरज
“””गहू, हरभन्यानंतर आता कांदा उत्पादक शेतकरी देखील संकटात सापडला आहे. कारण बदलल्या हवामानाचा कांदा पिकावर देखील मोठा परिणाम होताना दिसत आहे, तर दुसरीकडे रब्बी हंगामातील ज्वारी पिकावर लष्करी अळोच्चा प्रादुर्भाव इहला आहे. यामुळे शेतकरी, चारा पीक घेणारे पशुपालक पुरते हवालदिल झाले आहेत. सोयगाव कृषी विभागाने तातडीने लक्ष देण्याची गरज एखाद्या किडीच्चा प्रादुर्भाव पिकावर होताच कृषी विभागाने माहितीपर शिबिराचे आयोजन करणे गरजेचे आहे. कारण यापूर्वी लष्करी अळीने मका पिकाचे प्रचंड नुकसान केले. आता लष्करी अळीने ज्वारीचे नुकसान करण्यास सुरुवात केली असताना मार्गदर्शनासाठी कृषी विभागाने तातडीने गावोगावी शिबिरांचे आयोजन करावे व शेतकयांना योग्य मार्गदर्शन करावे अशी मागणी शेतकरी वर्गांतून होत आहे.
प्रा मदनभाऊ डोखळे सामाजिक कार्यकर्ते डाभा ता सोयगाव
0 8 9 4 8 1
Users Today : 11
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *