छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत
याविषयी सविस्तर माहिती अशी की, खरीप हंगाम २०२३ या हंगामात कमी पावसामुळे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील हजारो हेक्टर वरील कपाशी, सोयाबीन, तूर, मका, बाजरी, ज्वारी, ही पिके पावसाअभावी वाळून गेली आणि काही उरली सुरली सोयाबीन पीकं येलो मोझंक रोग आल्यामुळे सोयाबीनचे पीक जवळपास संपुष्टातच आले. तर कमी पावसामुळे कपाशीलाही बॉड लागली नाही. आता शेवट च्या टप्प्यात शिल्लक राहिलेले कापसाचे तसेच तुरीचे पीक अवकाळी पावसाने नष्ट केले. याबरोबरच गहू, हरभरा, ज्वारी, मका,आणि भाजीपाला या पिकांना जबरदस्त अवकाळी पावसाचा फटका बसला आहे. एकीकडे शेतकरी संकटात असताना राज्यकर्ते मात्र मंत्रालयात एसीमध्ये बसून मजा करत असल्याचे चित्र दिसत आहे. या अवकाळी पावसाने शेतकरी उध्वस्त झाला असून सरकारने त्वरित शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी, अन्यथा सरकारचे विरोधात अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीच्या वतीने राज्यभर तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीचे मराठवाडा विभागीय सरचिटनीस गोकुळसिंग राजपूत यांनी दिला आहे. यावर्षीच्या खरीप हंगामात शेतक-यांच प्रचंड नुकसान झाल्याने शेतकन्यांना पीक विमा कंपनीकडून मोठी अपेक्षा होती, राज्यात काही शेतकऱ्यांच्या खात्यात पीक विम्याची रक्कम जमा झाली आहे मात्र काही शेतकऱ्यांसाठी ही रक्कम म्हणजे केवळ दिवा स्वप्नच ठरली आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील शेतकन्यांची पिक विमा कंपनीकडून थट्टा केली जात आहे का ? असा प्रश्न गोकुळसिंग राजपूत यांनी उपस्थित केला आहे. अनेक शेतकऱ्यांच्या खात्यात दहा रुपये, वीस रुपये, पस्तीस रुपये, अशी तुटपुंजी मदत जमा करण्यात आली आहे सरकारला शेतकन्याबद्दल सहानुभूती असती तर अशी शेतकऱ्यांची थट्टा झालीच नसती. आता दोन-तीन दिवसापासून सुरू असलेल्या पावसामुळे शिल्लक राहिलेले कपाशीचीही वाट लागली आहे. तुर, गहू, हरभरा, मका, ज्वारी, या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे सरकारने आणखी वेळ न दवडता तातडीने पंचनामे करून शेतकन्यांना मदत जाहीर करावी अशी मागणी गोकुळसिंग राजपूत यांनी केली आहे. शेतीमालाला भाव मिळत नाही, सरकारचेसव्यापान्यावर लक्ष नाही. त्यामुळे व्यापारी शेतकऱ्यांना जसे लुटता येईल तसे ह लुटत आहे. तेव्हा सरकारने शेतक-यांच्या समस्येकडे गंभीरतेने पाहून शेतकन्यांना मदत करावी अन्यथा अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीचे मराठवाडा विभागीय सरचिटनीस गोकुळसिंग राजपूत यांनी दिला आहे. सरकार वैयक्तिक स्वार्थात मम्र राज्यातील शेतक-यांच्या संकटाकडे लक्ष द्यायचे सोडून सरकार वैयक्तिक स्वार्थात मग्न आहे. तु थोडचाच कालावधीनंतर लोकसभेच्या तसेच त्या पाठोपाठ विधानसभेच्या निवडणुका निवडणुका। होणार आहेत त्यामुळे सरकार व्यस्त आहे. सर्व सत्ताधारी मंत्रालयात बसून आहेत. जनतेचा विश्वास गमावल्यामुळे फक्त पैशाच्या जोरावर निवडणुका जिंकण्याची स्वप्ने सत्ताधारी तसेच विरोधी पक्षातील नेते बघत आहेत. नैसर्गिक आसमानी व सुलतानी संकटात शेतकन्यांना वाऱ्यावर सोडल्याने येणाऱ्या निवडणुकीत शेतकरी व राज्यातील जनता राज्यकत्यांना त्यांची जागा दाखविल्याशिवाय राहणार नाही अशी टीका गोकुळसिंग राजपूत यांनी केली आहे.
Users Today : 29